लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चिखली परिसरात अवैध रेती वाहतूक करीत असताना चार ट्रक तहसील कार्यालयातील अधिकार्यांनी रविवारी पकडले असून, त्यांना एकूण १ लाख ७ हजार ८00 रुपये दंड ठोठावला आहे.चिखली शहरात अवैध मार्गाने मोठय़ा प्रमाणात रेती वाह तूक होत असून, त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे. येथील नायब तहसीलदार कृणाल झाल्टे, मंडळ अधिकारी पी.पी.वानखेडे व तलाठी यांनी सुटीच्या दिवशी तपासणी करून गजानन रामदास अवसरमोल चांधई हे वाहन क्र. एम.एच.२0 एफ ५९४९ मधून १ बरास रेतीची वाहतूक करीत असताना पकडले व त्याला १५ हजार ४00 रुपये, विलास थुट्टे भरोसा हा गाडी क्र. एम.एच.२८ एबी ७८४४ मधून २ बरास रेतीची वाहतूक करीत असताना पकडले. त्याला ३0 हजार ८00 रुपये, शिवाजी रंगनाथ होईफोडे सुलतानपूर यास वाहन क्र. एम.एच.२८ आर ७४४४ मधून दोन बरास रेतीची वाह तूक करीत असताना पकडले व त्यांना ३0 हजार ८00 रुपये, दादाराव चेडोळ जांभोरा यास वाहन क्र. एम.एच.२८ बी ८२२८ मधून २ बरास रेतीची वाहतूक करीत असताना पकडले व त्याला ३0 हजार ८00 रुपये. दंड ठोठावला, असे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) नुसार तहसीलदार मनिष गायकवाड यांनी चारही लोकांना एकूण १ लाख ७ हजार ८00 रुपये दंड ठोठवला आहे.
चार ट्रक रेती पकडली; एक लाखाचा दंड वसूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:53 AM
चिखली : चिखली परिसरात अवैध रेती वाहतूक करीत असताना चार ट्रक तहसील कार्यालयातील अधिकार्यांनी रविवारी पकडले असून, त्यांना एकूण १ लाख ७ हजार ८00 रुपये दंड ठोठावला आहे.
ठळक मुद्देचिखली परिसरात अवैध रेती वाहतूकतहसील कार्यालयातील अधिकार्यांनी पकडले चार ट्रक१ लाख ७ हजार ८00 रुपये ठोठावला दंड