लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे चौघा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, चिखली तालुक्यातील दोन, देऊळगाव राजा तालुक्यातील एक तर जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एकाचा यात समावेश आहे. दुसरीकडे बुधवारी जिल्ह्यात ३६८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टद्वारे तपासण्यात आलेल्या २,१४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १,७७६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ३६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखली शहरातील ४३, हातणी एक, कोलारा १२, अंत्री खेडेकर एक, धोडप एक, दे. धनगर पाच, शेलूद दोन, मंगरूळ नवघरे दोन, इसरुळ दोन, मुरादपूर एक, वळती दोन, खैरव तीन, धोत्रा भणगोजी एक, भानखेड दोन, अंचरवाडी दोन, सवणा एक, खंडाळा एक, मेरा खुर्द एक, वाघोरा एक, सावरगाव डुकरे ३, तेल्हारा एक, भोरसा भोरसी एक, दहीगाव तीन, अमडापूर एक, आमखेड एक, गजरकेड तीन, सि. राजा दोन, रताळी एक, मोहाडी एक, भरोसा दोन, दुसरबीड एक, खैरखेड एक, सातगाव एक, कामगाव २७, हिवरखेड १८, बोथाकाजी एक, बोरी अडगाव तीन अंत्रज सहा, भालेगाव एक, रोहणा एक, सुटाळा बुद्रूक एक, घाटपुरी एक, पिंप्राळा एक, अजिसपूर एक, माळवंडी दोन, बिरसिंगपूर एक, दहीद बु. दोन, साखळी एक, सागवन एक, गिरडा एक, दत्तपूर एक, मोंढाळा एक, बुलडाणा ४९, शेगाव ३१, जानोरी नऊ, जवळपा दोन, सोनाळा एक, लोणार एक, मेहकर एक, बाऱ्हई दोन, जानेफळ १९, जळगांव जामोद १४, सुनगाव एक, कुरणगड चार, देऊळगाव राजा १५, चिंचोली बुरुकुल एक, आळंद एक, देऊळगाव मही दोन, डोढ्रा एक, नांदुरा १५, नारखेड एक, मोताळा एक, मलकापूर एकासह काही ग्रामीण भागातील व्यक्तींचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील पुसद येथील एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील दोन संशयितांचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान, चिखली तालुक्यातील तेल्हारा येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि धोत्रा भणगोजी येथील येथील ८० वर्षीय महिला, देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड वायाळ येथील ६७ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव येथील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी १२३ जणांनी कोरोनावर मात केली
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ३६८ जण पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:32 AM