प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,४४२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४,८३६ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ६०६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये बुलडाणा १६६, खामगाव २३, शेगाव १८, देऊळगाव राजा २१, चिखली ७१, मेहकर २४, मलकापूर ३५, नांदुरा ४३, लोणार ३५, मोताळा ६३, जळगाव जामोद २२, सिंदखेड राजा ७८, संग्रामपूर सात असे एकूण ६०६ पॉझिटिव्ह सापडले आहेत. आजपर्यंत पॉझिटिव्ह ४३,८२७ सापडले आहेत, तर निगेटिव्ह २,५४,२५२ आढळून आले आहेत. आजपर्यंत २९५ मृत्यू झाले आहेत. आज चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पहूर ता. जामनेर येथील ६० वर्षीय महिला, गुम्मी ता. बुलडाणा येथील ७० वर्षीय पुरुष, जयपूर ता. मोताळा येथील ७२ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनामुक्त ३७,६१८ आहेत. आज ३७३ रुग्णांना सुटी झाली आहे. क्रियाशील रुग्ण ५,९१४ आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:36 AM