संग्रामपूर (जि. बुलढाणा) : तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एका आदिवासी गावात तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. १५ फेब्रुवारी रोजीच्या रात्री गावातीलच अनारसिंग गुलाबसिंग सोळंके या ३४ वर्षीय व्यक्तीने १४ वर्ष ८ महीने २४ दिवसाच्या अल्पवयीन मूलीवर दबाव टाकत फूस लावून पळवून नेले. रविवारी दुपारी अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार १५ ला रात्री ९ वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर अल्पवयीन मुलीसह घरातील सर्वजण झोपले. अल्पवयीन मुलीचे वडील पहाटे ४ वाजता दरम्यान लघुशंकेसाठी उठले असता घरात मुलगी दिसून आली नाही. घरातच काही वेळ वाट पाहल्यावर वडील, आई व भाऊ यांनी गावात मुलीचा शोध घेत विचारपूस केली. मात्र, मुलगी दिसून आली नाही. नंतर समजले की आरोपी याने दबाव टाकत मुलीला पळविले आहे. तू मला सोडून गेली तर मी आत्महत्या करणार अशी धमकी देत आरोपीने अल्पवयीन मुलीवर दबाव टाकत फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रविवारी अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात आरोपी अनारसिंग सोळंके याच्या विरुद्ध कलम ३६३ भादविनुसार गून्हा दाखल करण्यात आला. सोनाळा पोलिसांकडून तपास सुरू असून अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आ