मोताळा (बुलडाणा): तालुक्यातील वारुळी येथील शेतकरी कैलाससिंग भरतसिंग बोराळे व कल्याणसिंग किसनसिंग कच्छवाह यांच्या गोठय़ांना १२ मार्चच्या सकाळी आग लागली. या आगीमुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. वारुळी येथील कैलाससिंग बोराळे व कल्याणसिंग कच्छवाह या शेतकर्यांचे नवीन गावठाण शिवारात गुरांचे गोठे आहेत. शनिवारी १२ मार्चच्या सकाळी १0 वाजेदरम्यान अचानक या गोठय़ांना आग लागली. या आगीत बोराळे यांचे शेती अवजारे, टिनपत्रे, कोंबड्या, ठिबकचे साहित्य, पीव्हीसी पाइप जळून ९0 हजारांचे तर कच्छवाह यांचे शेती अवजारासह कोंबड्या, टिनपत्रे, पाइप, ठिबक संच जळून ७0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी तत्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. घटना माहिती पडताच या भागाचे जि. प. सदस्य अनिल खाकरे पाटील, ङ्म्रीकृष्ण खराटे, विश्वास पाटील, नगरसेवक संजय गायकवाड, तेजराव पाटील, ठाणेदार दीपक कोळी, दुय्यम ठाणेदार शेवाळे, तलाठी आर. यू. भारसाखळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केला आहे.
गोठय़ांना आग
By admin | Published: March 13, 2016 2:07 AM