- नारायण सावतकर लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : ग्रामसेवकाच्या मदतीने सरपंचाने सुमारे सात लाख रुपयाचा घोटाळा केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणाचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला असून सरपंच व सचिवाकडून पैसे वसूल केले जाणार असल्याचे विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले.वरवटबकाल येथील ग्रामपंचायत संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ना त्या कारणाने ही ग्रामपंचायत नेहमीच वादाच्या भोवºयात सापडली आहे. येथील ग्रा. प. सदस्या बिबनुर बी शेख दस्तगीर यांनी दीड वर्षांपूर्वी वरवट बकाल येथील ग्रामपंचायतच्या झालेल्या भ्रष्टाचाराबाबत खातेनिहाय चौकशीची मागणी गटविकास अधिकारी संग्रामपूर यांना केली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा देखील ‘लोकमत’ने सातत्याने केला होता. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर चौकशी पुर्ण झाली. संग्रामपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भिलावेकर यांनी दिड वर्ष चौकशी करून वरवट बकाल येथील ग्रामपंचायत माध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल अभिप्रायासह वरिष्ठांना सादर केला. ग्रामपंचायत सदस्या यांनी केलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायत वरवट बकाल चे सरपंच श्रीकृष्ण दातार व सचिव डी.बी.कोरे यांनी शासनाच्या १४ वित्त आयोग व सामान्य फंड यामधील केलेले कामे ग्रामपंचायतच्या शासकीय दफ्तरी नोंद न घेता नियमबाह्य मनमानी पणाने शासकीय निधीचा दुरुपयोग केला. आर्थिक फायद्यासाठी सामान्य फंडातून कार्यालयीन व स्वच्छतेच्या नावावर ७८ हजार ८२ रुपये, पाणी पुरवठा फंडातून मजूर व साहित्याच्या नावावर २३ हजार ५० रुपये, १४ वित्त आयोग निधीमधुन पथदिवे २ लाख ८५३ रुपये, महिला बाल कल्याण १३ हजार रुपये, अंगणवाडी साहित्य खरेदी ८१ हजार २० रुपये, महिला बाल कल्याण ६१ हजार ७०० रुपये, शालेय साहित्य खेळणी ९४ हजार रुपये असा एकूण ६ लाख ९७ हजार ८०५ रुपये भ्रष्टाचार झाला. ४ लाख ५० हजार ७७३ रुपयांची केलेली कामे साहित्य खरेदी, नियम बाह्य व जमाखर्चास मंजुरात घेण्याबाबत ग्रा प नियमानुसार ठराव घेणे अनिवार्य असताना सरपंच सचिव यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले. १४ वित्त आयोग व सामान्य फंड निधीतुन नियमबाह्य साहित्य खरेदी केली आहे.
सरपंच श्रीकृष्ण दातार यांच्या कडून अर्धी रककम व सचिव डी.बी. कोरे यांच्याकडून अर्धी रककम वसुलीस पात्र आहेत. सखोल चौकशी केल्याचा अहवाल व अभिप्राय मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केला आहे.- जे.एम.भिलावेकर,विस्तार अधिकारी