कोरोनाचा वाढलेला कहर पाहता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्व स्तरावर कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी माजी सरपंच शेषराव सावळे, पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर व मधुकर महाले यांनी आरोग्य सभापती कमलताई बुधवत यांना असलेल्या औषधी साठा व लसीकरणाच्या तुटवड्याबाबत मागणी केली. त्यानंतर लगेचच कमलताई बुधवत यांनी संबंधित विभागाला पत्र देऊन औषध साठा उपलब्ध करून दिला. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने घरोघरी जाऊन मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करून नागरिकांनी त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. प्रशासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी व तसे न केल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने १०० रुपये दंड आकारणी सुद्धा करण्यात येईल, असेही सुचविण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत लसीकरण शिबिर, जनजागृती व आता मास्क, सॅनिटायझरचे वाटप करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृतीही करण्यात आली आहे. यावेळी माजी सरपंच शेषराव सावळे, मधुकर महाले, नंदकिशोर देशमुख, किरण ऊगले, सुभाष पवार, गंगाधर निकम, किरण देशमुख, मधुकर सिनकर व अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.
मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:43 AM