मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील जिल्हा परिषद शाळांना मास्क, सॅनिटायझर वाटपप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी सामाजिक उपक्रमाअंतर्गत मासरूळ सर्कलच्या सर्व जि. प. शाळांना सॅनिटायझर, मास्क, सॅनिटायझर-स्टँडचे वाटप केले. कोरोनो महामारीच्या काळातसुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता ज्ञानदानाचे पवित्र काम शिक्षकवृंद करीत आहेत. त्यांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा एक भाग म्हणून सामाजिक भान ठेवत जालिंधर बुधवत यांच्या वतीने मासरूळ जि. प. सर्कलमधील पाडळी, गिरडा, गोंधनखेड, इजलापूर, जनुना, मढ, गुम्मी, तराडखेड, मासरूळ, सोयगाव, पांगरखेड, शेकापूर, जामठी, वरुड, धामणगाव, डोमरुळ, कुलमखेड, सातगाव, कुंबेफळ, टाकळी या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांना सॅनिटायझर स्टँड, मास्क, सॅनिटायझर बॉटलचे वाटप केले. यावेळी पं. स. उपसभापती श्रीकांत पवार, सुधाकर आघाव, विजय इतवारे, अमोल शिंदे, डॉ. अरुण पोफळे, समाधान बुधवत, युवा सेनेचे संदीप पालकर, ग्रा. पं. सदस्य गणेश पालकर, प्रभाकर मघाडे यांच्यासह संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा समिती अध्यक्ष, शिक्षक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शाळांना मास्क, सॅनिटायझरचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:33 AM