चिखली : माॅं साहेब जिजाऊ जयंतीनिमित्त दिनांक १६ जानेवारी रोजी दीपस्तंभ कन्स्ट्रक्शन व वानखेडे परिवार यांच्यातर्फे चिखली येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक सिध्द सायन्स मंदिराजवळ आयोजित या शिबिरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील सहाय्यक नेत्रतज्ज्ञ आम्रपाली वानखडे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल वाकोडे होते. यावेळी सुभाष राजपूत, नगर संघचालक शरद भाला, प्रशांत ढोरे, विनायक सरनाईक, नगरसेवक दत्ता सुसर, मंगला झगडे, सुभाषआप्पा मंगरूळकर, मनिष मोरे, प्रा. बी. ए. खरात, एन. के. सरदार, मनोज दाभाडे, सलीम परवेज, दीपक गायकवाड, अंबादास जाधव, प्रकाश पाटील, प्रा. वाकोडे, प्रा. खिल्लारे, समाधान वाकोडे, प्रतिमा मोरे, अॅड. वानखडे, प्रा. बाळासाहेब इंगळे, कल्पना जाधव, मीना इंगळे, उदय कोकाटे, राहुल इंगळे, दिलीप इंगळे, सीमा पवार, दीपक जाधव, अमर जाधव, रवी इंगळे, अनिल चव्हाण, रविराज टाले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद भांडारे यांनी केले तर कल्पना जाधव यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दीपक जाधव, दिलीप इंगळे यांनी परिश्रम घेतले.