लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : शिवसेना व युवासेनेच्या वतीने लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबईच्या संयुक्त विद्यमाने येथे सोमवारला मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६०० रूग्णांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ.संजय रायमुलकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, मेहकर विधानसभा संपर्कप्रमुख सचिन पडवळ, जयचंद बाठीया, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, डॉ.उल्हामाले, पं.स.सदस्य निंबाजी पांडव यांच्याहस्ते करण्यात आले. सर्वप्रथम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली. लोककल्याण आ.केंद्र मुंबईचे डॉ.शरद चव्हाण, डॉ.रविंद्र चव्हाण, डॉ.शुभम मिश्रा यांनी नेत्रतपासणी केली. यशस्वीतेसाठी जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, पं.स.सदस्य निंबाजी पांडव, उत्तमराव परमाळे, सुरेशअप्पा फिसके, गजानन सातपुते, ग्रा.पं.सदस्य शामराव बाजड, डॉ.गजानन उल्हामाले, केशवराव आखाडे, भगवान बाजड, अनिल आवटी, प्रकाश मानवतकर, मुक्तेश्वर काळदाते, अॅड.रामेश्वर पळसकर, भागवतराव देशमुख, हमीद मुल्लाजी, कुंडलीक आखाडे, शेषराव पळसकर, अर्जुन बाजड, कैलास खंडारे, संदीप टाले, सुनिल पळसकर व पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
शिवसेनेच्यावतीने मोफत नेत्ररोग शिबीर; ६०० जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 1:53 PM