शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

पाच महिन्यांपासून गरजूंना माेफत भाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:40 AM

अमडापूर : उंद्री व पंचक्रोशीतील निराधार निराश्रित अंध अपंगांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून युवक दररोज जेवणाचे डबे ...

अमडापूर : उंद्री व पंचक्रोशीतील निराधार निराश्रित अंध अपंगांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून युवक दररोज जेवणाचे डबे पोहोचवून अन्नछत्र चालवित आहेत. त्यांना सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांच्या सेवायज्ञात आपलाही सहभाग असावा, म्हणून स्व. महादेवराव डहाके सेवाभावी फाउंडेशन उंद्रीच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके यांनी पाच हजारांची मदत दिली़, तसेच युवकांचा सत्कार केला़

निराधार, अंध अपंग भुकेलेल्यांसाठी अन्नछत्र सुरू करून किन्ही सवडत, उंद्री, तोरणवाडा, वैरागड, चिंचपूर व पिंप्री कोरडे येथील पंचावन्न निराधारांना दररोज जेवणाचे घरपोच डबे पोहोचविण्याच्या सेवाकार्याची माहिती मिळाली. नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर किन्ही सवडत येथे भेट देत, प्राथमिक स्वरूपाची मदत सेवाभावी फाउंडेशनच्या वतीने केली. भविष्यातही या अन्नछत्रासाठी यथायोग्य मदत करू, असे प्रतिपादन डहाके यांनी केले, तसेच समाजातील इतरही दानशूर व्यक्ती, संस्था यांनीही या सेवाकार्याचा वाटा उचलत मदतीचा हात देत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी या सेवाकार्यासाठी पुढाकार घेणारे तरुण सहकारी अमोल बोरपी यांच्यासह मुरलीधर क्षिरसागर, मनोहर कचाले, गणेश भारसाकळे, मुरलीधर महाराज हेलगे, समाधान क्षीरसागर, क्षत्रुगुंन बराटे, श्रीकृष्ण शेळके, कृष्णा मानकर, शिवा घोराडे, बंडू खरात, नारायण ठाकरे, हरी क्षीरसागर, यमुनाबाई घोराडे, वनिता बोरपी, उषा ठाकरे आदींचा सत्कार राम डहाके यांनी केला. अमोल बोरपी व सहकाऱ्यांचा आदर्श घ्यावा, जेणेकरून कुणी निराधार उपाशी राहणार नाही.