लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राष्ट्रीय जंत नाशक दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ आॅगस्ट व १६ आॅगस्टला आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान, १ ते १९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार त्यासाठी जिल्ह्यात सात लाख लाभार्थ्यांची संख्या आहे. जंतापासून मुक्त व मुलांना सशक्त करण्यासाठी प्रशासनाकडून मोहिमेची तयारी करण्यात येत आहे.आरोग्य विभाग जि. प. बुलडाणा, शिक्षण विभाग जि. प. बुलडाणा व महिला व बालकल्याण विभाग जि. प. बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त राबवावयाचा आहे. जंतनाशक गोळ्यांसाठी जिल्ह्यात ग्रामीण भागात पाच लाख २० हजार ८८५ व शहरी भागात १ लाख ८१ हजार ८४५ असे एकुण ७ लाख २ हजार ७३० लाभार्थी आहेत. १ ते १९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देवून ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात पुरेशा जंतनाशक गोळ्यांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. राष्ट्रीय जंत नाशक दिन ८ आॅगस्ट व मॉपअप दिन १६ आॅगस्टला राबवुन मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी केले.जिल्हाधिकारी डॉ. निरफपमा डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज एस., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. बाळकृष्ण कांबळे, डॉ. राजेंद्र सांगळे, डॉ. पानझाडे, अरविंद रामरामे, यांच्या मार्गदर्नानाखाली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाश्क मोहिम राबविण्यात येत आहे.(प्रतिनिधी)मोहिम यशस्वी करण्याचे आवाहनजिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या जंतनाशक मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समिती सभा निवासी उपजिल्हाधिकारी घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन या सभेतून करण्यात आले. जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफणे यांनी मोहिमेची संपूर्ण माहिती दिली. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिलींद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बढे, डॉ.साईनाथ भोवरे, खुजे, एन.आर.एच.एम, शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनीधी, जयमाला राठोड, आर. बी. जाधव, अविनाश पाटील, आर. पी. लोखंडे, सोनुने, संध्या जुनगडे यांची उपस्थित होती.जंताचा नाश केल्याने होणारे फायदेजंताचा नाश केल्याने बालकांना अनेक फायदे होतात. त्यामध्ये रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो, बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते, शारीरिक व बौध्दिक वाढ सुधारते तसेच बालकांचे आरोग्य चांगले राहते.
‘जंतापासून मुक्त, मुले होतील सशक्त’: बुलडाणा जिल्ह्यात जंतनाशक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 2:42 PM