लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनांतर्गत कर्जमाफी/ प्रोत्साहनपर इतर लाभ मिळविण्यासाठी अर्ज तथा घोषणापत्र मोफत ऑनलाइन भरण्यात येणार आहे. त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र, ‘आपले सरकार’ पोर्टल केंद्र, संग्राम केंद्र या ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे. सदर अर्ज व घोषणापत्र मिळविण्यासाठी वरील सर्व केंद्राशिवाय गावातील गटसचिव, संबंधित बँक शाखा, तालुक्याचे सहायक निबंधकांच्या कार्यालयात, जिल्हा मध्यवर्ती बँक बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्या कार्यालयाशी शेतकर्यांनी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांच्यावतीने करण्यात आले आहे. ऑनलाइन सादर करून कर्जमाफी योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, तसेच फॉर्म भरताना कोणतेही शुल्क मागितल्यास वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार करावी, अर्ज भरताना कोणतेही शुल्क अदा करण्यात येऊ नये, तसेच शेतकर्यांनी कुठलेही शुल्क देऊ नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी केले आहे.
कर्जमाफीचे अर्ज मोफत ऑनलाइन भरण्यात येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:19 AM
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनांतर्गत कर्जमाफी/ प्रोत्साहनपर इतर लाभ मिळविण्यासाठी अर्ज तथा घोषणापत्र मोफत ऑनलाइन भरण्यात येणार आहे.
ठळक मुद्देमहा-ई-सेवा केंद्र, ‘आपले सरकार’ पोर्टल केंद्र छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना