लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : यावर्षीची भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता, मुंबई येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेने विदर्भातील ५ जिल्ह्यातील १० गावांमध्ये टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यात येत आहे.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख गट ग्रामपंचायत अंतर्गत चिखली खुर्द व किन्हि महादेव येथे पाणी टंचाई दूर होईपर्यंत पाणी वाटप करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रपती पोलीस पदक विजेते, सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस कमिशनर अशोक गोरे यांनी गावकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. पाणी पुरवठ्यासाठी निधीचा धनादेश सरपंच, ग्रामसेवकांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त हिम्मतराव तरटे, डॉ. केदार जाधव, व्यवस्थापक राजेश गवळी, पिंपरी देशमुखचे सरपंच गजानन काळे, माजी पं.स. सदस्य विलास काळे, सरपंच किन्हि महादेव शिवदास बगाडे, माळी सेवा मंडळ अध्यक्ष प्रल्हाद बगाडे, अजय तायडे, कैलास उगले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक अनंता हिरडकर, प्रदीप सातव यांनी केले. आभार गुलाबराव इंगळे यांनी मानले.
विदर्भ न्यासकडून मोफत पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 3:07 PM