खामगाव : ग्रामीण डाक सेवक संघटनांनी २२ मे पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत देशव्यापी संप १२ व्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने सुरू असून आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामीण डाकसेवकांनी व्यक्त केला आहे.देशातील ७० टक़्के जनता ही ग्रामीण भागात असून देशातील डाक विभागाचे जाळे हे शाखा डाकघरांच्या माध्यमातून जुडले आहेत. देशातील सुमारे १.३५ लाख शाखा डाकघरे व २.७० लाख ग्रामीण डाकसेवक सद्यास्थितीत बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पुर्णत: ठप्प झाली आहे. ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतु केंद्र सरकार जाणीवपुर्वक ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या रास्त मागण्या शक्य तेवढ्या लवकर निकाली न निघाल्यास ग्रामीण डाकसेवक तीव्र आंदोलन छेडणार आहेत.२ जुन रोजी मुख्य पोस्ट आॅफीस समोर ग्रामीण डाकसेवकांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या. विभागीय सचिव कॉ.प्रभाकर झाडोकार, जी.आर. देशमुख, एस.एस. धोत्रे, किशोर दसोरे, प्रभुदास गव्हांदे यांच्या नेतृत्वात खामगाव उपविभागांतर्गत सर्व शाखा डाकघरातील ग्रामीण डाकसेवक उपस्थित होते. यावेळी संपकाळात मृत्युमुखी पडलेले कॉ. लक्ष्मण सुवासे, कॉ.डी.एल. बिराजदार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)
खामगाव मुख्य डाकघरासमोर ग्रामीण डाकसेवकांचा १२ व्या दिवशी संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:26 PM
खामगाव : ग्रामीण डाक सेवक संघटनांनी २२ मे पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत देशव्यापी संप १२ व्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने सुरू असून आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामीण डाकसेवकांनी व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देदेशातील सुमारे १.३५ लाख शाखा डाकघरे व २.७० लाख ग्रामीण डाकसेवक सद्यास्थितीत बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पुर्णत: ठप्प झाली आहे. ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.२ जुन रोजी मुख्य पोस्ट आॅफीस समोर ग्रामीण डाकसेवकांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या.