सुधीर चेके पाटीलचिखली (जि. बुलडाणा), दि. ६- नगरपालिकेच्यावतीने ह्यस्वच्छ चिखली मिशनह्ण राबविण्यात येत असून हगणदरीमुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी उघड्यावर शौचास जाणार्यांचे फोटो शहरातील प्रमुख चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे.चिखली नगर पालिकेने हगणदरीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. या अभियाना अंतर्गत शहरातील शौचालये नसलेल्या १ हजार ४0३ कुटूंबियांना अनुदान उपलब्ध करून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून त्यांचा नियमित वापर करणे बंधनकारक करण्यासोबतच शहरात विविध भागात आवश्यक असलेल्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये तसेच महिलांची कुचंबना टाळण्यासाठी शहरात आवश्यक त्या ठिकाणी मुतारीची देखील व्यवस्था करण्याचा मानस मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण हगणदरीमुक्तीसाठी ८१२ शौचालयांची गरजचिखली शहरातील शौचालये नसलेल्या १ हजार ४0५ कुटूंबापैकी ७९४ कुटूंबांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, यातील ५९३ कुटूंबियांनी पालिकेच्या पुढाकाराने शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास नेले असून, चिखली शहर हगणदरीमुक्त होण्यासाठी अद्याप ८१२ कुटूंबांनी वैयक्तिक शौचालयांची उभारणी करणे गरजेचे आहे.शौचालये न उभारणार्यांवर फौजदारी करवाईशौचालये उभारण्यासाठी पालिकेकडून अनुदान घेऊनही शौचालयांची उभारणी न करणार्या २00 कुटूंबीयांना शौचालयांचे बांधकाम तातडीने करण्याबाबत सुचित करण्यात आले असून त्यानुषंगाने पाठपुरावा देखील चालविला आहे; मात्र या पश्चातही शौचालयांचे बांधकाम करण्याचे टाळणार्या कुटूंबांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
उघड्यावर शौचास जाणार्यांचे फोटो झळकणार चौकात!
By admin | Published: March 07, 2017 2:48 AM