लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: स्थानिक आगारातील इंधन संपल्याचा फटका शनिवारी एसटीला बसला. आगारात इंधनच शिल्लक नसल्याने दुपारनंतर बुलडाणा आगाराची एकही बस स्थानकातून धावली नाही. तर रात्री बुलडाणा-नागपूर ही बस अपुºया इंधनामुळे केवळ खामगावपर्यंच पोहोचू शकली. इंधन तुटवड्यामुळे बुलडाणा बस स्थानकाचे कामकाज प्रभावित झाल्यानं, ऐन कोरोनात एसटीच्या उत्पन्नाला ब्रेक बसल्याचे चित्र आहे.गत वर्षभरात कोरोना विषाणू संसर्गाची झळ सोसणाºया एसटी महामंडळाला संजिवनी देण्यासाठी ५० क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, अधिकाºयांच्या सुमार नियोजनाचा फटका एसटी महामंडळ आणि प्रवाशांना बसत असल्याचा प्रकार शनिवारी बुलडाणा येथे समोर आला. बुलडाणा एसटी आगारात इंधन शिल्लक नसल्याने शनिवारी दुपारनंतर एकही एसटी धावू शकली नाही. अपुºया इंधनामुळे बुलडाणा बसस्थानकातून अनेक शेड्युल्ड रद्द करण्यात आले. तर काही ठराविक बसेसनी कमी पल्ल्याचे अंतर कापले. इंधन तुटवड्यामुळे प्रवासी आणि चालक-वाहकही वेठीस धरल्या गेले.
नियोजनाअभावी प्रवासी वेठीस- कोरोना विषाणू संसर्गामुळे गत वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिक झळ सोसावी लागत आहे. उत्पन्न वाढीसाठी महामंडळाकडून कोरोनाकाळात मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जात असतानाच काही अधिकाºयांच्या नियोजन शुन्यतेचा फटका प्रवाशांसोबतच महामंडळालाही बसत आहे.
अधिकारी नॉटरिचेबल!- इंधनामुळे बुलडाणा एसटी महामंडळाचे कामकाज प्रभावित झाल्यानं शनिवारी दिवसभर बुलडाणा बस स्थानकात गोंधळ दिसून आला. इंधन तुटवड्याची अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता, स्थानक प्रमुखांनी चक्क कानावर हात ठेवले. तर वरिष्ठ अधिकाºयांनी एकदा फोन उचलला काहीही न बोलता, नंतर नॉट रिचेबल झाले.
खामगाव येथून घेतले इंधन- शनिवारी दुपारनंतर बुलडाणा स्थानकातून बसेस धावू शकल्या नाहीत. तथापि, एमएच ४० एक्यू- ६२५० या क्रमाकांच्या बसमध्ये खामगाव येथून जाण्या-येण्या एवढे डिझल असल्याने, ही बस सुरूवातीला खामगावपर्यंतच सोडण्यात आली. लांब पल्लयाच्या प्रवाशांनाही खामगावपर्यंतच तिकीट देण्यात आले. दरम्यान, खामगाव येथे डिझल मिळाल्यानंतर या बसने नागपूर पर्यंतचा प्रवास केल्याचे समजते.