श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त, राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात श्री बालाजी महाराज संस्थान सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजाच्या वतीने दोन लाख अकरा हजार रुपयांचा निधी राजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी संकलन समितीकडे सुपूर्द करण्यात आला. सर्व समाजबांधव, भक्तांनी या मंगल कार्यात निधी समर्पणासह निधी संकलनाकरिता रामकाजी बनून योगदान द्यावे व सर्व देवस्थानांनी या राष्ट्रीय स्वाभिमानाचे पुनरुत्थान असलेल्या राम जन्मभूमीच्या मंदिर निर्माण कार्यात समर्पण करावे, असे आवाहन राजे विजयसिंह जाधव यांनी केले आहे.
या निधी समर्पणप्रसंगी स्थानिक निधी संकलन समितीचे अभियान संयोजक शुभम देवउपाध्ये, नगर संघचालक पुरुषोत्तम धन्नावत, प्रमोद धाराशिवकर, बिपीन मल्लावत, दीपक मल्लावत, दीपक खेते, सूरज गुप्ता, यांच्यासह राजाभाऊ पुजारी, श्रीपाद गोंदकर, वसंतराव कुलकर्णी, रामभाऊ कुंभारीकर, गोविंद देव, विनायक टोणपे, उदय पुजारी, रावसाहेब पुजारी, चंद्रकांत पुजारी, अरविंद पुजारी, दिलीप पुजारी, सुरेशअप्पा दीडहाते, पी.बी. जाधव, अंकुश सावजी, ॲड. भाला, संस्थानचे व्यवस्थापक किशोर बीडकर, आशिष वैद्य, डॉ. किरण मोगरकर, मंगेश जगदाळे आदी उपस्थित हाेते.