शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

नातेवाइकांनी पाठ फिरवलेल्या कोरोना मृतांवर बुलडाण्यात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:26 AM

Corna News Buldhana कोरोनामुळे मृत्यू झालेले व संदिग्ध मृतांसह तब्बल १६५ पार्थिवांवर बुलडाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व नातेवाइकांनी अंत्यसंस्कारासाठी पाठ फिरवलेल्या पार्थिवांवर बुलडाण्यातील दोन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेले व संदिग्ध मृतांसह तब्बल १६५ पार्थिवांवर बुलडाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यासाठी जवळपास दहा लाख २५ हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बऱ्याच मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक पुढे आले नाहीत तर काही संदिग्धांचे पार्थिवही संबंधित गावात स्वीकारल्या गेले नाहीत. त्यामुळे अखेर प्रशासनाच्या सुचनेनुसार बुलडाण्यातील दोन्ही स्मशानभूमींमध्ये त्यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. दुसरीकडे बुलडाणा पालिकेनेही मधल्या काळात अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची योजना कार्यान्वित केली होती. त्याचाही फायदा अशा पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यास झाला. ३० मार्चपासून आजपर्यंत बुलडाणा पालिकेंतर्गतच्या दोन्ही स्मशानभूमीमध्ये कोरोना व्यतिरिक्त मृत्यू पावलेल्या १६५ व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यापोटी आतापर्यंत तब्बल दहा लाख २५ हजार रुपयांचा खर्च आला आहे. यामध्ये कोरोनाबाधित व कोरोना संदिग्ध असलेल्या ५५ पार्थिवांचा समावेश आहे. प्रारंभीच्या काळात बुलडाण्यातील स्मशानभूमिमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासच विरोध झाला होता. त्यावरून अगदी पोलीस ठाण्यापर्यंत वाद पोहोचले होते. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. आतापर्यंत डोणगाव येथील दोन, देऊळगाव घुबे, मलकापूर, धोत्रा भनगोजी, गुळभेली, मासरूळसह जिल्ह्यातील अनेक गावातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या पार्थिवाला विसावा देण्यात आला असल्याची माहिती अंत्यविधीसाठी लाकडे पुरविणाऱ्यांनी दिली.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेकांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक पुढे आलेले नाहीत. त्यांच्या पार्थिवावर पालिकेने स्थानिकांच्या सहकार्याने अंत्यसंस्कार केले. कोरोना मृतव अन्य आजाराने तथा वृद्धापकाळाने मृत्यू झालेल्या जवळपास १६५ व्यक्तींच्या पार्थिवावर गेल्या सहा महिन्यात दहा लाख २५ हजारापर्यंत पालिकेचा खर्च झाला आहे.- संजय गायकवाड, शिवसेना आमदार, बुलडाणा

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या