- गजानन कलोरे शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानची श्रींची पंढरपूरला आषाढ एकादशी शेगाववरून पाचशेच्या वर वारकऱ्यांसह ८ जुन रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. ती १० जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली. आषाढ एकादशी उत्सवसाठी १० ते १५ जुलै श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम होता. श्रींची पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास १६ जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू झाला आहे.श्रींचे परतीचा प्रवास दरम्यान १६ जुलै रोजी पहिला मुक्काम करकंद, १७ जुलै ला कुर्मदास, कुईवाडी मुक्काम, १८ रिधोरे, उपजाई स्टेशन मुक्काम, १९ ला भगवान बार्शी येथेच मुक्काम, २० ला माणकेश्वर, भुम मुक्काम, २१ रोजी कुंशलगिरी, चौसाळा मुक्काम, २२ उदंड वडगाव, पाली मुक्काम, २३ ला बीड मुक्काम, २४ पेडगाव, गेवराई मुक्काम, २५ शहागड, शहापूर मुक्काम, २६ पारनेर, तालवाडी मुक्काम, २७ ला धनगर पिंप्री जालना मुक्काम, २८ ला जाना, जालना मुक्काम, २९ जुलैला न्हावा, सिंदखेडराजा मुक्काम, ३० रोजी किनगाव राजा, बिबी मुक्काम, ३१ किनगाव जट्टू लोणार मुक्काम, १ आॅगस्ट सुलतानपूर मेहकर मुक्काम, २ आॅगस्ट नायगाव दत्तापूर, जानेफळ मुक्काम, ३ आॅगस्ट वरवंड, शिर्ला नेमाने मुक्काम, ४ ला विहीगाव, आवार मुक्काम, ५ आॅगस्ट खामगाव मुक्काम व ६ आॅगस्ट रोजी शेगाव येथे दाखल होणार आहे.श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५२ वे वर्षे असून आपली पायदळ वारीची यशस्वी परंपरा कायम ठेवून आहे. पंढरपूर ते शेगाव असा ५५० कि.मी. चा परतीचा प्रवास व शेगाव ते पंढरपूर असा जाण्या-येण्याचा १३०० कि.मी. या पायदळ प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)