शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘श्रीं’च्या प्रकटदिनानिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 6:12 PM

श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने २५ फेब्रुवारीरोजी श्रींचा १४१ वा प्रगट दिनोत्सव लाखो भक्तांच्या मांदीयाळीत उत्साहात पार पडला. 

- गजानन कलोरेलोकमत न्यूज नेटवर्क शेगाव :  ‘अणुु रेणूमध्ये ब्रम्ह व्यापीले लय उत्पत्ती समान।माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रकटला योगी महान। गजानना अवलीया अवतरले जग ताराया’ .. श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने २५ फेब्रुवारीरोजी श्रींचा १४१ वा प्रगट दिनोत्सव लाखो भक्तांच्या मांदीयाळीत उत्साहात पार पडला. सोमवारी सकाळी १० वाजता श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने महारूद्र स्वाहाकार यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील व अध्यक्ष नारायणराव पाटील, विश्वस्त डॉ.रमेशचंद्र डांगरा, गोविंदराव कलोरे, विश्वेश्वर त्रिकाळ, अशोकराव देशमुख, चंदुलाल अग्रवाल, पंकज शितुत, किशोर टांक यांच्यासह मान्यवरांच्या ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत यागाची पुर्णाहूती करण्यात आली. श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १४१ वा प्रगटदिन उत्सवानिमित्ताने २० ते २५ या दरम्यान सकाळी ५ ते ६ काकडा, ७.१५ ते ९.१५ भजन सायंकाळी ५.१५ ते ६ हरीपाठ, रात्री ८ ते १० किर्तन असे विविध कार्यक्रम नित्याने परंपरेनुसार हजारो भक्तांच्या श्रवणाने पार पडले.  श्रींच्या मंदीर परिसरामध्ये विविध आकर्षक विद्युत रोषणाईने संपुर्ण परिसर सजला होता. भक्तांच्या शिस्तप्रिय दर्शनाचा लाभ घेतला. श्रींच्या मंदीरात राज्याच्या विविध भागातून श्रींच्या मंदीरात दर्शनासाठी भक्तांची मांदीयाळी जमली होती. संस्थानच्यावतीने दर्शनासाठी मंदीरात एकेरी मार्ग सुनियोजित व्यवस्था करण्यात आली होती. त्यात दर्शनबारी व श्रींचे मुखदर्शन, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी पलंग दर्शन व औदुंबर दर्शनाची नियोजन करण्यात आले होते. दरम्यान हभप श्रीरामबुवा ठाकूर यांचे किर्तन पार पडले. 

श्रींच्या पालखीची नगर परिक्रमाश्रीसंस्थानच्या मंगलमय परिसरातून श्रींची रजत मुखवट्याचे पुजन श्री संस्थाचे कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांच्या शुभहस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे विधीवत पूजन ब्रम्हावृंदांच्या मंत्रोच्चारात हजारो भक्तांच्या उपस्थितीत टाळ मृदंगाच्या निनादात करण्यात आले व श्रींच्या नामघोषात श्रींच्या पालखीची सुरूवात मंगलवाद्यासह व श्री गजानन महाराजांच्या नामघोषात गज, अश्व, टाळकरी पदाकाधारी वारकºयांच्या सहभागाने श्रींची पालखी नगर परिक्रमेकरीता मार्गस्थ झाली. याप्रसंगी श्री संस्थानचे विश्वस्त व अध्यक्ष नारायण पाटील विश्वस्त रमेशचंद्र डांगरा, विश्वस्त गोविंदराव कलोरे, विश्वेश्वर त्रिकाळ, अशोकराव देशमुख, किशोर टांक, चंदुलाल अग्रवाल, पंकज शितुत, श्री गजानन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक रामेश्वर काठोळे, राजेंद्र शेगोकार, मधुकर घाटोळ आदिंचे उपस्थितीत लावली होती.श्रींच्या पालखीसमवेत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दिंडी, श्री गजानन महाराज इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची दिंडी, नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या दिंडीचा सहभाग नगर परिक्रमेमध्ये होता. श्रींच्या पालखीचे महादेव मंदीर, शितलनाथ महाराज धर्मशाळा, श्रींचे प्रगटस्थळ, सितला माता मंदीर येथे श्रींच्या विश्वस्त यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमा मार्गात विविध ठिकाणी रांगोळ्या काढून व श्रींची आरती पुजन करून श्रींच्या रजत मुखवट्यावर पालखीवर पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणी नगरवासी भक्तांनी श्रींच्या पालखीचे स्वागत मनोभावे केले. श्रींची पालखीव्दारे मनोउत्सवात आनंदात रिंगण सोहळा देखना ठरला.श्रींच्या प्रगटदिनानिमित्त संतनगरीत ११५२ भजनी दिंड्या विविध ठिकाणाहून शहरात दाखल झाल्या होत्या. श्री संस्थानच्यावतीने सर्व दिंड्यांची सन्मानपुर्वक आनंद विसावा परिसरात नियोजन बध्द पध्दतीने व्यवस्था केली होती. या ४९ हजारावर दिंडीतील वारकºयांची संख्या होती. यामध्ये १०२ भजनी दिंड्यांना संस्थानची नियमाची पुर्तता केल्याबद्दल भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये १० टाळ, १ विणा, १ मृदंग, १ हातोळी, सहा पताका, १ ज्ञानेश्वरी ग्रंथ, एकनाथी भागवत ग्रंथ, तुकाराम गाथा असे भजनी साहित्य श्री संस्थानच्यावतीने देण्यात आले. तर अंशदानसाठी ७०० भजनी दिंड्या सहभाग करण्यात आला. याशिवाय संस्थानच्यावतीने महाप्रसाद यात्रा काळात दिवसरात्र सुरू होता. सह्योग ५० च्या वर  भजनी दिंड्याना मंडपासाठी देण्यात आला. त्याचप्रमाणे श्री संस्थानच्या नियमाची पुर्तता व यात्रा काळात निटनेटका पेहराव, आकर्षक पावली, गायन, पावली आदि बाबाींची पाहणी करून १० भजनी दिंड्यांना विशेष बक्षीस संस्थानच्यावतीने देण्यात आले.श्रींचे यात्रा काळात श्रींचे समाधीचे दर्शनासाठी श्रींचे मंदीर लाखो भक्तांनी दिवस-रात्र शिस्तीत दर्शनाचा लाभ घेतला. संस्थानच्यावतीने दर्शनबारीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहापाण्याची व्यवस्था, वैद्यकीय औषधोपचार, माता शिशु कक्ष आदिंची व्यवस्था नित्याप्रमाणे करण्यात आली श्रींचे दर्शन भक्तांनी शिस्तीत घेतले. 

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजShegaonशेगावbuldhanaबुलडाणा