लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेगाव - खामगाव रोडवरील शिवराज फार्म हाऊसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला जुगार अड्डा रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. या कारवाईत खामगाव, अकोला आणि शेगाव येथील एकूण २८ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, या ठिकाणाहून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शिवराज फॉर्म हाऊसमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार धाड टाकण्यात आली. जुगार खेळणाऱ्या २८ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. तर नूरखा नसीमखा, मंगेश जगन्नाथ काळे, नितीन नारायण इंगळे, नीलकंठ बळवंत पाटील, गजानन अंबादास, विजय लोखंडे, संजय पांडुरंग पाटील, राजेश देविदास काळे, ज्ञानेश्वर अंबादास सोळंके, सुनील काशीराम वावणे एस. डब्ल्यू. एस.शाळे जवळ खामगाव, मदन मुरलीधर झुुंझूनवाला, मो. अनिस मो.हनीफ, शेख युसूफ शेख मुनीर, मोहन गणेश गिरी रा. गुरुदेव नगर अकोला, चंपालाल ओंकारदास राठी, गजानन संदीप खंडागळे, अंबादास सखाराम लबारे, साजिद खान युसूफ खान, श्रीकृष्ण खंडू केकाण, अजय रवी प्रकाश ठाकूर, मधुकर वसंतराव वर्ग रा. चांदमारी खामगाव, प्रकाश शिवपा वानखेडे, शेख मुश्ताक शेख गणी, शेख कलीम शेख महेमूद, शेख फ्रॉड शेख चांद, संजय सदाशिव देशमुख, गजानन सुखदेव सोनोने, बाळू उर्फ नंदकिशोर विठ्ठल डागवाले या जुगाऱ्यांना अटक करून शेगाव ग्रामीण पोलिसात आणण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, उप निरीक्षक दिनकर गोरे, एएसआय प्रकाश राठोड, लक्ष्मण कटक यांनी केली.
जुगारावर धाड; २८ जुगारी ताब्यात
By admin | Published: May 30, 2017 12:50 AM