खामगाव: तालुक्यातील शेलोडी शिवारातील तित्रंव रोडवर सुरू असलेल्या एका जुगारावर ग्रामीण पोलीसांनी छापा मारला. यात पाच जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात खामगाव ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. गजानन दराडे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, शेलोडी शिवारातील तित्रंव रोडवरील आरोपीच्या घरी जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून छापा टाकला असता, भागवत गणेश जावळकार ३८ रा. जवळा, गणेश शिवाजी शेंबडे ३७ रा. शेगाव, विनोद जनार्दन जाधव ४३ रा. शेलोडी, गजानन रमेश लोखंडे ४० रा. शेगाव, शेख नईम शेख रहेमान वय ३६ रा. शेगाव जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या जवळून रोख सात हजार ४८० रुपये आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी िवरोधात महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम १२ अ अन्वये कारवाई करण्यात आली.