शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

गणराया.. आले होऽऽऽ!

By admin | Published: September 06, 2016 2:15 AM

सर्वत्र उत्साहाचे वातावरण; बुलडाणा जिल्हय़ात ८७४ मंडळांनी केली श्रीगणेशाची स्थापना.

बुलडाणा, दि. ५ : विघ्नहर्ता गणेशाची सोमवारी धार्मिक वातावरणात घरोघरी तसेच मोठय़ा उत्साहात व ढोलताशाच्या निनादात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापना केली. जिल्ह्यात ८७४ सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने संध्याकाळपर्यंत श्रीगणेशाची स्थापना केली होती. त्यात शहरी भागातील ३३७ तर ग्रामीण भागातील ५३७ गणेश मंडळांचा समावेश आहे. ङ्म्री गणेशाच्या आगमनाची मागिल एका आठवड्यापासून जोरदार तयारी सुरू होती. तोच उत्साह आज दिवसभर शहरातील भक्तांमध्ये होता. बर्‍याच गणेश भक्तांनी एक दिवस अगोदर गणेश मूर्तींंची खरेदी केली, तरी आज सकाळपासूनच बुलडाणा आठवडी बाजारातील महात्मा फुले चौक, कारंजा चौक, बाजार लाइन, आठवडी बाजार मार्ग आदी परिसरात गणेशमूर्ती आणि पूजा-अर्चा, साहित्याची खरेदी करण्यासाठी अबालवृद्ध भाविकांची वर्दळ होती. शहरातील बाजारपेठ विविध फुलांच्या दुकानांनी सजली असल्याने सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता. गणेशमूर्ती घेऊन जाताना गणेशभक्त गणपती बाप्पा मोरया, अशा जोशामध्ये जयजयकार करीत असल्याने वातावरण प्रफुल्लीत झाले होते. शहरात घरगुती श्रीगणेशाची स्थापना सकाळी ११.२२ वाजेपासून दुपारी १.५0 वाजेपर्यंत विधीवत पूजेने करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळाने सायंकाळी ६ नंतर स्थापनेचा मुहूर्त साधला. यावेळी अनूचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या धार्मिक वातावरणात शांतता राखण्यासाठी जिल्ह्याभरात ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, २७00 पोलीस कर्मचारी, १0 पोलीस निरीक्षक, २0 सहायक पोलीस निरीक्षकासह एसआरपीएफ व सीआरपीएफच्या तीन कंपन्या, आरसीपीच्या ५ प्लाटून, ३00 जवान बाहेरून बोलविण्यात आले हो ते. याशिवाय १ हजार गृहरक्षक दलाचे जवान असा भक्कम बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. २७७ गावात ह्यएक गाव-एक गणपतीह्णजिल्ह्यातील ह्यएक गाव, एक गणपतीह्ण या संकल्पनेतून २७७ गावातील मंडळातील मंडपात श्री गणराया विराजमान झाले आहेत. सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावातून ग्रामीण भागात गणेशोत्सवाची आज सुरुवात झाली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या योजनेंतर्गत सर्व संबंधि ताना उत्सव काळात धार्मिक वातावरणात कोणताही अनुचित प्रकार उद्भवणार नाही. या दृष्टीने योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. उत्सवाच्या काळात फुलांना मागणी असल्याने फूल विक्रेत्यांनी शेवंती, गुलाब, मोगरा, झेंडू, काकडा, कणेर, केवडा, शमी, दुर्वा आदी विक्रीसाठी आणलेले आहेत. महिला छेडछाड विरोधी पथक तैनातकायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचू पाहणार्‍या २ हजार ४४७ समाजकंटकांना १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आल्या असून, ३ हजार ६५३ व्यक्तींवर १0७ तर ३५८ व्यक्तींवर ११0 प्रमाणे प्र ितबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कलम ५६ व ५७ अन्वये ८५ व्यक्तींवर हद्दपारीची, ३८४ व्यक्तींवर दारूबंदी, १ हजार २00 व्यक्तींवर मुंबई पोलीस कायदा तर ८२६ व्यक्तींवर १४४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.