संग्रामपुर : महात्मा गांधी यांनी अहींसा, शांती, क्षमा या मुल्यांची शिकवण आयुष्यभर दिली. या महामानवाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. खेर्डा येथुन जळगाव मतदासंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातुन गावोगावी जाऊन स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या पदयात्रेमध्ये भाजपाच्या पदधिकाय्रांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला. तालुका अध्यक्ष डाँ गणेश दातीर, अपर्णा कुटे, जळगाव नगराध्यक्षा सिमाताई डोबे, राजेंद्र गांधी, भारतभाऊ वाघ, ज्ञानदेव भारसाकडे, जानराव देशमुख, राजेंद्र ठाकरे, पांडूरंग हागे, नंदाताई हागे, आदींचा सहभाग होता. समारोप वरवट बकाल येथे करण्यात आले. संग्रामपुर तालुक्यात सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली. गांधीच्या प्रतिमेला हार अर्पण करून पुजन करण्यात आले. जयंती कार्यक्रम तालुक्यातील ग्रामपचायती, शाळा, शासकीय निमशासकीय कार्यलयांमध्ये पार पाडण्यात आले. वरवट बकाल, कवठळ बावनबिर या तीन गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. कवठळ येथे कोरम अभावी ग्रामसभा तहकुब करण्यात आली. तर वरवट बकाल बावनबिर येथे ग्राभसभा घेण्यात आली. सभेमधून तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील पातुर्डा, वानखेड, टुनकी, सोनाळा, सगोडा गावांमध्ये कार्यक्रम झाले. तर बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत परीसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गांधी जयंतीनिमित्य स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 4:09 PM