- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची २ आॅक्टोबर रोजी १५० वी जयंती साजरी होत असून जयंतीच्या पर्वावर शासनाने जयंतीचे एक चिन्ह तयार केले आहे. गांधी जयंतीच्या या चिन्हाची राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर छाप दिसून येत असून चिन्हावर ‘क्लीक’ केल्यानंतर महात्मा गांधींच्या कार्यकर्तृत्वाचा आलेखच समोर असल्याने सध्या हे चिन्ह जनमानसात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या संकेत स्थळावर हे चिन्ह दिसून येत असून महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती निमित्त ही संकेत स्थळेही आता गांधीमय होत आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोलीसह अन्य जिल्हांच्या संकेत स्थळावर हे चिन्ह दिसत आहे.प्रत्येक जिल्हाच्या संकेत तळाच एक वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या अनुषंगाने या संकेतस्थळांवर एक समानसुत्र दिसून येत असून ते म्हणजे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे चिन्ह. यावर्षी २ आॅक्टोबर रोजी साजरी होणारी महात्मा गांधी यांची जयंती १५० वी असून त्यासाठी शासनस्तरावरून जयंतीचे एक आगळेवेगवळे असे हे चिन्ह तयार करण्यात आलेले आहे. १५० या संख्येतील एक क्रमांक हा महात्मा गांधी यांची काठी तर शुन्यामध्ये चरखा दाखविण्यात आला आहे. हे चिन्ह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर मुख्यपृष्ठवरच टाकण्यात आल्याने संकेतस्थळ उघडताच ते आकर्षक दिसत आहे.
चिन्हातून उलगडतो इतिहासमहात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तयार करण्यात आलेल्या चिन्हातून महात्मा गांधीजींचा इतिहास उलगडतो. या चिन्हावर ‘क्लीक’ केल्यानंतर महात्मा गांधीजींच्या जीवनातील वेगवेगळे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. महात्मा गांधीजींच्या बालपणापासूनचे वेगवेगळे छायाचित्र व त्याची माहिती या ठिकाणी मिळते. विद्यापीठ ते साबरमती आश्रमात सायकलने जात असलेले गांधीजी असे काही आकर्षक चित्रही यामध्ये आहेत.
गांधीजींच्या जीवनातील काही ‘व्हिडीओ’१५० व्या जयंतीच्या चिन्हावर गेल्यानंतर महात्मा गांधीजींच्या जीवनातील काही महत्त्वाचे ‘व्हिडीओ’ याठिकाणी पाहावयास मिळतात. या व्हिडीओतून गांधीजींचा संघर्ष समोर येतो. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण या चित्रफीतीतून अधोरेखीत करण्यात आले आहेत.
देशपातळीवर जयंतीची रुपरेषा२ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची जयंती ही देशपातळीवर साजरी होते. गांधीजींच्या जयंती निमित्त होणाºया देशपातळीवरील कार्यक्रमाची रुपरेषा या चिन्हातून समोर येते. कार्यक्रमांचे नियोजन, स्वच्छता अभियानासाखे विविध उपक्रम यावर नमुद करण्यात आले आहेत.