शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

Ganesh Festival : ‘रजतनगरी’ च्या क्रीडा क्षेत्रातील ‘वैभव; श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 2:35 PM

खामगाव : ‘स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन वास करते’ हा विचार बालमनावर बिंबवून क्रीडा क्षेत्रात रजतनगरी अर्थात खामगावचे नाव राज्यस्तरावर चमकविणारे  मंडळ म्हणून श्री हनूमान गणेशोत्सव मंडळाचा लौकिक आहे

-देवेंद्र ठाकरेलोकमत न्युज नेटवर्क खामगाव : ‘स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन वास करते’ हा विचार बालमनावर बिंबवून क्रीडा क्षेत्रात रजतनगरी अर्थात खामगावचे नाव राज्यस्तरावर चमकविणारे  मंडळ म्हणून श्री हनूमान गणेशोत्सव मंडळाचा लौकिक आहे. विशेष म्हणजे याच मंडळातील अमोल ढिसले, प्रविण अवलकार, विजय घाडगे, राजु घोडेचोर, आकाश वायचाळ, गौरव बंदले, विक्की बंदले, प्रविण बंदले, रितेश पाल, राजु परदेशी आदी जवान सैन्यात देशसेवा करत आहेत. खामगाव शहरातील सतिफैल भागातील हनुमान व्यायाम गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९५२ साली झाली. मंडळाच्या स्थापनेनंतर हे  ६६ वे वर्ष आहे. या मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी क्रीडा मैदानावर वर्चस्व सिध्द केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पाच वर्षांनी स्व.फक्कुजी निंदाणे, स्व.नंदुमहाराज चव्हाण, स्व.आवटेजी तसेच दिनकरराव आमले, सुदामराव चव्हाण, रजपालसिंग चव्हाण, चंद्रकांत रेठेकर,  राम बोंद्रे, डिगांबर गलांडे, दर्शन ठाकूर यांनी परिसरातील युवकांना एकत्र आणले व हनुमान मंडळाची स्थापना केली. मागील ६६ वर्षांमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध क्रीडा प्रकारात राज्यभरात मंडळासोबतच स्वत:चा नावलौकि केला आहे. मंडळाची अद्यावत व्यायामशाळा आहे. दररोज शेकडो तरूण येथे बलोपासना करतात.  शरीराबरोबरच बुध्दीचाही विकास व्हावा, यासाठी मंडळाच्या वतीने बालवाडी, वाचनालय चालविण्यात येते. दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कबड्डी, मल्लखांबच्या सामन्यांचे आयोजन या व्यायाम मंडळाच्या मैदानावर केले जाते. गणेश विसर्जन मिरवणूकीत युवकच नव्हे तर मंडळाच्या युवतींचा सक्रीय सहभाग असतो. यामध्ये मल्लखांब, फुगडी, मुलींचे लेझिम पथक, मुलींचे झांज  पथक, जिमनॅस्टीक, लाठी-काठीसह चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली जातात. मुलींचे लेझिम पथक व झांज पथक विसर्जन मिरवणुकीतील विशेष आकर्षण असते. शहरातील जुन्या मंडळांमध्ये गणल्या जाणाºया हनुमान मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, गरीबांना कपडे वाटप, रोख मदत, व रक्तदान शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाचे ३० ते ४० कार्यकर्ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात चमकले आहेत. कबड्डीपटु सुरेंद्रसिह मेहरा यांनी अश्वमेध २०११  स्पर्धेत मंडळाचे नेतृत्व करून सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. सध्या मंडळाचे अध्यक्ष राम बोंद्रे हे असून यावर्षी विक्की घोडेचोर, किशोर बोर्डे, कुंदन यादव, धिरज यादव, गणेश कोमुकर, रविंद्र बोंद्रे, लखन रेठेकर, राजु ताकवाले, उमाकांत रेठेकर, जितेंद्रसिंग मेहरा, सुरज विभुते यांच्यासह विविध तरूण मंडळाची धुरा सांभाळत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावGanpati Festivalगणेशोत्सव