शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Ganesh Festival: सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान गणेश मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:55 PM

सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान मंडळलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :   येथील शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाचा सर्व धर्म समभाव जोपासना करणारे मंडळ म्हणून नावलौकीक आहे. या भागात मिश्र वस्तीचा समावेश असल्यामुळे कार्यकारिणीतही सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना स्थान दिले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर या मंडळाचा अधिक भर असला तरी, परिसरातील गोर गरीबांच्या ...

सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान मंडळ

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:   येथील शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाचा सर्व धर्म समभाव जोपासना करणारे मंडळ म्हणून नावलौकीक आहे. या भागात मिश्र वस्तीचा समावेश असल्यामुळे कार्यकारिणीतही सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना स्थान दिले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर या मंडळाचा अधिक भर असला तरी, परिसरातील गोर गरीबांच्या सेवेसाठी मंडळाचे पदाधिकारी सदैव अग्रेसर असतात. नवनवीन संकल्पनांमुळे या मंडळाला शासनाकडून वारंवार गौरविण्यात आले आहे.

वीर हनुमान गणेश मंडळाची स्थापना सन १९८५ च्या कालावधीत झाली असून, सन १९९२ साली वीर हनुमान मंडळाची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली.  परिसरातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन बांधवांचा समावेश या मंडळाच्या कार्यकारिणत केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या समुदायातील व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाते.

महिला सशक्तीकरण, शेतकरी  आत्महत्या, पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक समस्यांवर या मंडळाकडून वेळोवेळी कृतीशील उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी मंडळाने गणेशोत्सव कार्यकारिणी अध्यक्षपदी प्रमोद सुरेश रोकडे(जैन) यांची निवड केली आहे. तर उपाध्यक्ष समाधान लोढे, सचिव शेख इरफान शेख युसुफ,  सहसचिव  संतोष डवंगे, कोषाध्यक्ष प्रल्हाद संपत बोदडे, श्याम कोथळकर, जसवंतसिंह शीख अशी सर्व धर्म समभावाची कार्यकारीणी तयार केली आहे. पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेशावर या मंडळाचा अधिकभर राहतो. त्यामुळे विविध सामाजिक संघटनांसोबतच पोलिस आणि महाराष्ट्र शासनाकडूनही मंडळाला वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांना हारार्पण केल्याशिवाय या मंडळाकडून श्री गणेशाची स्थापनाच केली जात नाही. हे या मंडळाचे वेगळे वैशिष्टे म्हणावे लागेल.

लोककलांची जोपासना!

सामाजिक एकोप्यासोबतच लोककलांची जोपासना करण्यासाठी वीर हनुमान मंडळाचे पदाधिकारी नियमित प्रयत्नशील असतात. रूग्णसेवेतही हे मंडळ सदैव अग्रेसर राहते. व्यसनमुक्ती, आरोग्य विषयक जनजागृती आणि एडस् जनजागृती विषयक कार्यक्रमामध्ये मंडळाचा नेहमीच पुढाकार राहतो. 

समाजातील उपेक्षीत आणि वंचितांची सेवा करण्यासोबतच राष्ट्र धर्माचे पालन वीर हनुमान मंडळाकडून केले जाते.   सर्व धर्म समभावाची जोपासना हे वीर हनुमान मंडळाचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.

- अ‍ॅड. मनदिपसिंह शीख, मार्गदर्शक, वीर हनुमान मंडळ, शंकर नगर खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावGanpati Festivalगणेशोत्सव