खामगाव : शहरात सकाळी 11 वाजता शांततेत सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी पाच वाजता गालबोट लागले. मस्तान चौकात जय भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह दोन नगरसेवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.मानाच्या लाकडी गणपतीचे पूजन करून सकाळी 11 वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सकाळपासून निवडणूक अगदी शांततेच्या मार्गाने सुरू होती. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे मस्तान चौकात पोलीस चौकीत ठाण माणूस मांडून होते. संध्याकाळी साडेचार वाजता जय भवानी गणेशोत्सव मंडळ निर्मल टर्निंग जवळ पोचले. याठिकाणी सुद्धा गणेश भक्त युवक शांततेतच मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान आमदारांना भेटण्यासाठी काही नगरसेवक मस्तान चौकात जाण्यासाठी निघाले. याठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांसोबत नगरसेवकांचा वाद झाला. एसआरपी जवानांनी त्यांना तिकडे जाण्यासाठी रोपले त्यामुळे नगरसेवक खवळले. अखेर हा वाद शिगेला पोहोचला पोलिसांनी नगरसेवकां सह जय भवानी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. विशेष म्हणजे यादरम्यान आमदार आकाश फुंडकर व अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे हे मस्तान चौकातील पोलीस चौकीत उपस्थित होते. आमदार महोदयांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यां ची समजूत काढली. त्यानंतर मिरवणूक पुढे निघाले शहरात या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 6:07 PM