शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

गॅस सिलिंडरचा काळाबाजार

By admin | Published: September 11, 2014 12:34 AM

बुलडाणा बँकेतून अनुदान मिळणे बंद झाल्याने हॉटेलमध्ये वापर वाढला.

हर्षनंदन वाघ, नीलेश शहाकार/ बुलडाणागॅस सिलिंडरचा तुटवड्याची झळ गृहीणीसह संपुर्ण कुंटुबालाच बसत असते. अपुरा पुरवठा आणि त्यात गॅस सिलिंडरचा होत असलेला काळाबाजार व व्यावसायिक कामासाठी घरगुती सिंलेडरचा सुरू असलेला सर्रास वापर लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे. त्याच बरोबर घरगुती सिलेंडर मधुन व्यावसायिक सिंलेडरमध्ये गॅसभरण्याचा अवैध धंदा जोरात सुरू असल्याने पुरवठा विभागाने त्वरीत कारवाई करण्याची गरज लोकमत स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अधोरेखीत झाली आहे. बुलडाणा शहर परिसरात बिअरबारसह जवळपास ६0 मोठी हॉटेल्स, १५0 पेक्षा जस्त छोटी हॉटेल, खानावळी आहेत तर २५0 पेक्षा जास्त चहाटपरी व स्टॉलस् आहेत. यातील अनेक हॉटेलमध्ये बाहेर लाकडाची किंवा कोळशाची चूल तसेच इले क्ट्रीक शेगडीचा वापर होताना दिसत असला तरी आत हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा वापर होतो. शासनाने यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना केवायसी प्रणाली सक्तीची केल्यापासून व्यावसायिक गॅस सिलिंडर दिसून येत होते. मात्र आता पूर्वीप्रमाणे ग्राहकांना अनुदानाची सुट देवून सिलिंडर देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे घरगुती वापरासाठीचे गॅस सिलिंडरची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर पुन्हा वाढला आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या निळ्या रंगाच्या गॅस सिलिंडरमागे लपवून अनुदानित सिंलेडरचा वापर सर्रास होताना दिसुन येतो. केवळ बुलडाणा शहरातच जवळपास ५00 घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरित्या वापर होत आहे. दरम्यान जल्हा पुरवठा अधिकारी एस बी भराडे यांनी गॅस सिलिंडरचा हॉटेल व खासगी वाहनांत वापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यास प्रकाराची पड ताळणी करुन योग्य कारवाई करण्यात येईल असे सांगीतले. महसूल प्रशासनाचा अर्थपूर्ण कानाडोळा असल्याचे लोकमतने आज १0 सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागात राबविलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान दिसून आले.