हिवरा आश्रम : लहानपणापासून आय.पी.एस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्याफासे पारधी तांड्यावरील शक्तीमान युवराज पवार याने इयत्ता दहावीच्यापरिक्षेमध्ये ८४ टक्के गुण घेऊन यश मिळविले आहे. फासे पारधी समाजातूनयेवढे मोठे यश मिळविणाऱ्या या मुलाचा जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारीयांनी स्वत: आपल्या दालनात गुणगौरव केला.शक्तीमान हा फासे पारधी समाजातील असून त्याचे वडील शेती सोबतच फासे पारधीसमाजातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. शक्तीमानच्या दहावीच्यायशाबद्दल त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिद््द, चिकाटीला कठोरपरिश्रमाची जोड देत दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवीले. शक्तिमाननेअत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपल्या कठोर परिश्रमाने उत्तुंग भरारीघेत आईवडीलांच्या स्वप्नांना साकार केले आहे. शक्तीमान हा प.पू.शुकदासमहाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाचाविद्यार्थी आहे. मुलाच्या उज्जल भविष्यासाठी युवराव पवार यांनी आपल्याप्रयत्नाची पराकाष्टा केली. शक्तीमानने सुध्दा वडीलांच्या अपेक्षापूर्तीसाठी कुठेच कसर ठेवली नाही. रात्रंदिवस केवळ अभ्यासाचा ध्यास घेऊनदहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळाले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दलजिल्हाधिकारी पुलकुंडवार आणि अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनीशक्तिमान पवार व त्याच्या आई-वडिलाचा सत्कार केला. यावेळी युवराज पवार,महेंद्र सौभागे, समाधान अकाळ, धर्मराज पवार, सिद्धू खेडेकर, रत्नाताईपवार, विद्यमान पवार आदी उपस्थित होते.फासे पारधी हा समाज आजही शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसोदूर आहे. जंगलातीलपशू-पक्ष्यांची शिकार करून त्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे लोक.रोजगार नाही, म्हणून वषार्नुवर्ष दारीद्रयात खितपत पडलेली जमात, अशाआदिवासी तांड्यावरती शक्तीमान युवराज पवार यांने दहावीच्या परिक्षेत ८४टक्के मिळवून यशाला गवसणी घातल्याने आदिवासी तांडयावर आनंदाला उधानआल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
शक्तिमानचा जिल्हाधिकाºयांच्याहस्ते गौरव
By admin | Published: June 20, 2017 1:30 PM