आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हटले जाते. मोहोर येण्याची प्रक्रियाही पावसाच्या ओढ देण्यावर अवलंबून असते. साधारणात ऑक्टोबर महिन्यात पालवी व त्यांनतर पक्व अवस्था संपल्यानंतर जानेवरी महिन्यात आंबा मोहरायला लागतो. पण पावसाळा संपल्यानंतर ही पाऊस पडत राहिला तर मोहोर येण्याची प्रक्रिया रखडत असते परिणामी मोहोर उशिरा आल्याने पावसाच्या तोडांवर हे फळ येत असते. त्यामुळे होणाऱ्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. वातावरणातील बदलामुळे तुडतुडे, मिज, माशी, भुरी, करपा याचा प्रादुर्भाव होऊन आंब्याचा मोहोर वाळणे सुकणे गळण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान हाेत आहे. अनेक शेतकरी आंब्याच्या फळबागाची लागवडही आर्थिक उत्पादनाचे स्रोत म्हणून करीत आहेत. त्यामुळे शेत शिवारात ठिकठिकाणी फुलणाऱ्या आंब्याचे झाडे लक्ष वेधून घेत आहे.
धामणगाव धाड परिसरात गावरान आंबे बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:32 AM