कोरोना संसर्ग आजाराचे बाधित रुग्ण शहरासह ग्रामीण भागात सुद्धा झपाट्याने वाढत आहेत़ त्याचा फैलाव होऊ नये म्हणून संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत़ परंतु ग्रामीण भागात रोजच्या जगण्यासाठी बहुसंख्य नागरिकांना राेजगार असणे तितकेच महत्त्वाचे आहे़ त्यातच कोरोना महामारीच्या काळात जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडल्याने एकीकडे काम नाही तर दुसरीकडे महागाईचा भडका यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत़ गत १२ महिन्यात तर इंधन दरवाढ, खाद्यतेल, उडीद डाळ, मूग ,तुवर, हरभरा इतर सर्व जीवनावश्यक वस्तूचे दर माेठ्या प्रमाणात वाढले आहेत़ ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्याने खर्च व उत्पन्न यात ताळमेळ राहिला नाही़ त्यामुळे, शासनाने मदत देण्याची मागणी हेात आहे़
महागाईच्या भडक्याने सर्वसामान्य त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:37 AM