खामगाव : कोट्यवधी हिंदूचे आस्थेचे केंद्र असलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी न्यायव्यवस्थेकडून प्रचंड दिरंगाई केली जात आहे. न्यायाधीशांकडून दिले जाणारे उत्तर लाजीवाणे असल्याने, सरकारने दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन अद्यादेश काढावा आणि राम मंदिर निर्माणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांनी येथे केले.
स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. जानेवारीत अयोध्येला जाण्यासाठी सज्ज व्हा, राम मंदिराच्या निर्माणाचा संकल्प घ्या, असा हुंकारही त्यांनी या सभेत भरला. यावेळी देवनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज म्हणाले की, भगवान श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्यवंशी होते. प्रभु राम आणि शिवाजी महाराजांच्या वंशाचेच रक्त प्रत्येक भारतीयांच्या धमण्यांमध्ये वाहत आहे. मात्र, काही राजकारणी आपल्या स्वार्थासाठी हिंदू धर्मातील विविध जातींमध्ये भेद आणि तेढ निर्माण करीत, या आधारावर स्वत:ची राजकीय पोळी शेकत आहेत. त्यांच्या बुध्दीभेदाला कोणताही थारा न देता, युवापिढीने प्रभु रामाच्या उभारणीत
हिंदूशी टक्कर घेण्याची ताकद मुसलमानांमध्ये नाही. श्रीराम मंदिर उभारण्यास सिया मुसलमानांचा विरोध नसल्याचेही स्पष्ट करतानाच, केवळ सुन्नी मुसलमान राम मंदिराच्या उभारणी विरोधत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही धर्माच्या इतिहास हा चार हजार वर्षांपेक्षा जास्त नाही. याउलट सनातन हिंदू धर्माला पुरातन इतिहास आहे. त्यामुळे आजचे मुसलमानही पूर्वी हिंदूच होते, असेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित हुंकार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प.पू. नारायण महाराज शिंदे, ज्ञानेश्वर महाराज वाघ, केंद्रीय संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे, यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला हभप लक्ष्मीनारायण दायमा महाराज, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, नगराध्यक्षा अनिताताई डवरे, गोपालबाबू खंडेलवाल, सनतकुमार गुप्ता, राठी, यांची उपस्थिती होती. याप्रसंगी नारायण महाराज शिंदे, विनायकराव देशपांडे यांचीही समयोचित भाषणे झालीत.
यावेळी जीतेंद्रनाथ महाराज यांचे स्वागत प्रांत संयोजक अमोल अंधारे, बापू करंदीकर, भगवान तायडे, श्रीकृष्ण तायडे, बाळू घोराळे, चंद्रकांत घोराळे, पिंटू धोरण, गजानन धोरण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संचालन राजेंद्रसिंह राजपूत, मयुरेश कुळकर्णी यांनी केले. या विशाल हुंकार सभेला विश्व हिंदू परिषद, अकोला व बुलडाणा विभागातील धर्मप्रेमी नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.