खामगाव: श्री जगदंबा संस्थान घाटपुरी येथील जय जगदंबा वेद विद्यालयाचा भूमिपूजन सोहळा गुरूवारी दुपारी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि रामजन्मभूमी अयोध्याचे कोषाध्यक्ष तथा मथुरा जन्मभूमीचे उपाध्यक्ष प.पू. स्वाामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याहस्ते पार पडला.
श्री महर्षि वेद व्यास प्रतिष्ठान आळंदीअंतर्गत घाटपुरी येथील श्री जगदंबा माता मंदिरात वेद विद्यालय चालविण्यात येते. या विद्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन सोहळा नवरात्रोत्सवाच्या पहिल्यादिवशी आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संदीप नेते, आ. आकाश फुंडकर, आ. संजय सिरसाट, चंद्रकांत पाटील, आ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज, हभप संजय महाराज पाचपोर, बुलढाणा अर्बन बॅकेचे राधेश्याम चांडक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पौराहित्य पुणे येथील महेश नंदे, खामगाव येथील आशिष अशोक सराफ, ब्रिजमोहन भट्टड, अनुजा भट्टड,मदनलाल भट्टड यांनी केले. यावेळी जय जगदंबा वेद विद्यालयाचे अध्यक्ष् पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, सचिव निलेश भैय्या, व्यवस्थापक पुरूषोत्तम भट्टड, योगेश इंदोरिया, घनश्याम भुतडा, निमिष चांडक, राधेश्याम जांगीड, कमलकिशोर मंत्री, डॉ. मधुसुदन भट्टड, रतन राठी आदींची उपस्थिती होती. खामगाव येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसर्वप्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते भूमिपूजन स्थळी पाेहोचले. यावेळी मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी जगदंबा संस्थान आणि श्री जगदंबा वेद विद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून मुख्यमंतत्र्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला चार तासांचा विलंबघाटपुरी येथील भूमिपूजन सोहळ्यानंतर श्रीधर महाराज वारकरी भवन येथे प्रमुख सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, नियोजित वेळेपेक्षा मुख्यमंत्री तब्बल चार तास विलंबाने पोहोचले. त्यामुळे वारकर्यांच्यासत्कारासह इतर नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.