लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा बुलडाणा जिल्ह्याचा ९०.८१ टक्के निकाल लागला आहे. मुलींमध्ये बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात अव्वल आहे. फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीची परिक्षा जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ९८ परिक्षा केंद्रांवरुन घेण्यात आल्या. यात नियमित ३१ हजार ८७९ आणि पुन:परिक्षार्थी १३९४ अश्या एकूण ३३७७३ विद्यार्थी सहभागी झाले होते. दुपारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला असून, ३१ हजार ८७९ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ९३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी १५ हजार ९३० मुले तर १३ हजार ९ मुली उत्तीर्ण झाल्या. अमरावती विभागात मुलींमध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल आहे. अमरावती जिल्ह्यात मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.३७ टक्के आहे तर अकोला जिल्ह्याची९३.१४ टक्के, वाशिम ९२.२७ टक्के, यवतमाळ ८८.५५ टक्के बुलडाणा ९३.४९ टक्के आहे.जिल्ह्यात बुलडाणा तालुक्याचा निकाल ९२.२९ टक्के, मोताळा ९३.२३ टक्के, चिखली ९०.८१ टक्के, देऊळगाव राजा ९०.८१ टक्के, सिंदखेड राजा ९३.८४ टक्के, लोणार ८८.७४ टक्के, मेहकर ९२.३१ टक्के, खामगाव ९०.१० टक्के, शेगाव ८५.१६ टक्के, नांदूरा ९०.६४ टक्के, मलकापूर ८७.१९ टक्के, जळगाव जामोद ९२.१६ टक्के, संग्रामपूर ८७.७२ टक्के निकाल लागला आहे.