उंद्री : येथील ग्रामपंचायतीचे व्यापारी गाळे अनेक वर्षांपासून येथील व्यापाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामधील अनेक व्यापारी हे स्वतः त्याच्यामध्ये व्यापार न करता दुसऱ्यांना भाड्याने देत आहेत. तसेच ग्रामपंचायतीला भाडेसुद्धा भरत नाहीत. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांकडून ते गाळे परत घेऊन गावातील दिव्यांगांना द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने गाळे व्यापाऱ्यांना दिले आहेत. अनेक व्यापारी त्याचा वापर न करता बाहेरगावातील व्यापाऱ्यांना भाड्याने देत आहेत. तसेच त्यांच्याकडून भाडे वसूल करीत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीला कराचा भरणा करीत नाहीत. अशा व्यापाऱ्यांकडून हे गाळे परत घेऊन गावातील दिव्यांग व बेराेजगार युवकांना देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली, तालुकाध्यक्ष रफ़ीक शेख तथा ग्रामपंचायत सदस्य उन्द्री, राजीक खान शहर अध्यक्ष, प्रमोद राऊत, दीपक गिर्हे, प्रकाश गवारगुर यांच्यासह ३१ जणांच्या सह्या आहेत.