तालुक्यातील आमखेड-अंबाशी, मेरा बु., मेरा खुर्द या व परिसरातील शिवारात २८ जूनला ढगफुटीसदृश पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा पुरता खचला असल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची एकरी २० हजारांची आर्थिक मदत देण्यात यावी. अंबाशीसह इतर गावांतील घरांची पडझड झालेल्या नागरिकांना १० हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोंद्रे, महिला जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे, विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटी, तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, शेखर बोंद्रे, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, प्रशांत डोंगरदिवे, विशाल काकडे, सतीष बाहेकर, प्रतापसिंग पवार, प्रमोद चिंचोले, दिलीप महाजन, संकेत पाटील, रत्नमाला सोळंकी, कल्पना केजकर, बानुबाई जैवाळ, महाजन, श्रध्दा बोरकर, भागीरथी सिताफळे, नंदू वराडे, नदीम देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:24 AM