लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व स्तरातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्था आदी या कामासाठी सरसावले आहेत. त्यांच्या या कामाचा सन्मान करून शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हगणदरीमुक्त गट असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, हगणदरीमुक्त तालुके मलकापूर आणि शेगाव यांचे सभापती आणि गटविकास अधिकारी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचे काम वेगात सुरू आहे. या वर्षात सध्यापर्यंत तीस हजारांपर्यंत शौचालय बांधकाम पुर्ण झालेले आहे. यासाठी सर्व स्तरावरील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, काही सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांचेच सहकार्य लाभत आहे. त्याचीच फलश्रुती म्हणजे जिल्ह्यात मलकापूर आणि शेगाव ही दोन तालुके हगणदरीमुक्त झाली. जिल्ह्यातील एकूण ३४३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त तर एकूण अडीच लाख शौचालय बांधकाम पूर्ण झालेले आहेत. यासाठी मलकापूर तालुक्यातील दाताळा गटातील सदस्य तथा जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, नरवेल जिल्हा परिषद गटाच्या सदस्य तथा उपाध्यक्ष मंगला रायपुरे, देवधाबा गटाचे सदस्य केदार एकडे तसेच शेगाव तालुक्यातील आळसणा गटाचे राजाभाऊ भोजने, चिंचोली गटाच्या उषा सावरकर, माटरगाव बु., गटाच्या स्वाती देवचे, मलकापूर पंचायत समिती सभापती संगीता तायडे, गटविकास अधिकारी अशोक तायडे, शेगाव पंचायत समिती सभापती विठ्ठल पाटील, तर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे आदींचा प्रातिनिधिक स्वरूपात मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच ज्यांचे गट हगणदरीमुक्त होणे बाकी आहे, अशांना आवाहन पत्र देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र वितरित करण्यात आले. तसेच जिल्हा लवकरात लवकर हगणदरीमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.
हगणदरीमुक्तीसाठी उत्कृष्ट कार्य करणार्यांचा गौरव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:13 AM
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व स्तरातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्था आदी या कामासाठी सरसावले आहेत.
ठळक मुद्देहगणदरीमुक्त शेगावमलकापूरच्या सभापती, ‘बीडीओं’चा सन्मान