शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

देव तारी त्याला कोण मारी, अडीच तासांच्या प्रयत्नाने वाचला गुराख्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 10:39 PM

दोन गुराख्यातील एक विहिरीत पडतो काय..? दुस-या मदतीसाठी महामार्गावर येतो काय, चालती गाडी थांबवून एक युवक पुढे जातो काय, त्याला जमत नाही म्हणून मित्रांना बोलावतो काय अन् सगळ्यांच्या प्रयत्नातून गुराख्याचा जीव वाचतो काय ?

- हनुमान जगतापमलकापूर : दोन गुराख्यातील एक विहिरीत पडतो काय..? दुस-या मदतीसाठी महामार्गावर येतो काय, चालती गाडी थांबवून एक युवक पुढे जातो काय, त्याला जमत नाही म्हणून मित्रांना बोलावतो काय अन् सगळ्यांच्या प्रयत्नातून गुराख्याचा जीव वाचतो काय? हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून खामगावनजीक पहुरजिरा शिवारात घडलेली घटना आहे. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण अधोरेखित करणा-या रविवारी दुपारी घडलेल्या घटनेत मलकापूरच्या अकरा तरुणांच्या अडीच तासांच्या थरारक प्रयत्नांनी गुराख्याचा जीव वाचला. शेवटी संकटात सापडलेल्या हिंदू समाजाच्या गुराख्यास मुस्लीम तरुणांनी मरणाच्या दारातून परत आणल्याने माणुसकी जोपासताना जाती-पातीच्या राजकारणाला महत्त्व नसते हे पुरोगामी विचार अधोरेखित करणारी ही घटना होय.पहुरजिरा येथील रहिवासी सहदेव कैलास पारसकर व वासुदेव सुरडकर खामगाव-जलंबदरम्यान रेल्वे मार्गानजीक शिवारात गुरे चरत होते. सहदेव पारसकर शेतातील विहिरीवर गेला. तर लाकडाची घिल्डी अचानक तुटल्याने तोल सुटून तो विहिरीत पडला. विहिरीत सुमारे १२ फूट पाणी असल्याने तो कसाबसा दगडाला पकडून राहिला. वासुदेव सुरळकर धावत आला त्याने सहका-याला बघितलं. तो मदतीसाठी सैरावैरा धावत महामार्गावर आला त्याने गाडी थांबविली.त्या गाडीत अब्दुल मोईन हा युवक खाली उतरला व त्याने त्याची आतेबहीण व जावयास पुढे निघून जा, असे सांगत वासुदेव सोबत त्या विहिरीकडे धाव घेतली. येऊन बघतो काय सहदेवची मृत्यूशी झुंज सुरू होती. बांधकाम विरहीत ३० फूट विहिरीतून बाहेर काढायचे कसे? ह्या विचारात अब्दुल मोईनने आधी खामगाव येथे सायंकाळच्या विवाह समारंभासाठी येत असलेल्या सहका-यांना रेल्वेतून खाली उतरण्यास सांगितले व स्वत: उडी घेतली.मलकापूरचे साजीद खान, जुबेर बाबरु, आरीफ कुरेशी, आलीम बागवान, राजा कुरेशी, मोहम्मद जुनेद आदींसह दहा जण घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासांच्या थरारक प्रयत्नानंतर सहदेवला बाहेर काढल्यानंतरच अकरा तरूणांनी सुटकेचा श्वास सोडला. तोवर गावकरी दाखल झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा