शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

३० लोटाबहाद्दरांवर गुड मॉर्निंग पथकाचे ‘सर्जिकल स्ट्राइक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 12:23 AM

खंडाळा, शेलगाव, एकलारा येथे गुड मॉर्निंग पथकाची कारवाई : प्रत्येकाला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने १४ जुलैच्या पहाटे तालुक्यातील खंडाळा मकरध्वज, शेलगाव जं. व एकलारा येथे उघड्यावर शौचास बसलेल्या ३० जणांना ताब्यात घेऊन टमरेल, बाटल्यासह चिखली पोलीस ठाण्यात आणले होते. दरम्यान, या ३० जणांना प्रत्येकी १०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील गावे हगणदरीमुक्त व्हावीत, यासाठी पंचायत समिती स्तरावरून २ आॅक्टोबर २०१४ पासून प्रयत्न होत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील जनतेकडून यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर आता थेट कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मार्च २०१८ पर्यंत चिखली तालुका हगणदरीमुक्त करण्याचे ध्येय ठेवून पंचायत समिती स्तरावरून प्रभावीपणे प्रचार व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शौचालयांचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर करणाऱ्या कुटुंबास १२००० रुपयांचे बक्षिसदेखील देण्यात येते. तरी सुद्धा तालुक्यातील ९९ पैकी केवळ १९ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त होऊ शकल्या आहेत. उर्वरित गावांत सर्व आवश्यक बाबी व उपाययोजना करूनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता पंचायत समिती स्तरावरून गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर जाणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत १४ जुलै रोजी खुद्द गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सहायक गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी विस्तार अधिकारी फदाट, अंभोरे, फुलझाडे, भंडारे, आरोग्यसेवक राजपूत, स्वच्छ भारत कक्षाचे कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील तीन गावांमध्ये भल्या पहाटे उघड्यावर शौचास बसलेल्या ३० जणांवर कारवाई केली. यामध्ये खंडाळा म. येथील शहाजी शदर ठेंग, श्रीराम ओंकार माठे, शुभम लक्ष्मण भुतेकर, विशाल सुखदेव मलवार, शेलगाव जं. येथील कैलास आश्रू ठेंग, परशराम माणिकराव अंभोरे, शालिकराम भगवान चवरे, जगन्नाथ रामभाऊ भवरे, गोपाल कैलास ठेंग, दिनकर विठोबा पवार, प्रल्हाद नारायण चव्हाण, भुजंगराव पाटीलबा ठेंग, उपसरपंच सुभाष कडुबा पंडागळे, दलसिंग सुखलाल बडगे, ग्रा.पं. सदस्य श्रावण सुखलाल बडगे, निखिल रमेश मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर सखाराम ठेंग, दिनकर तेजराव ठेंग, रामेश्वर नामदेव सपकाळ, भीमाशंकर बडगे, तर एकलारा येथील अभिमन्यू नामदेव महाळणकर, विष्णू पाटीलबा चेके, किसन सखाराम सिरसाट, अजय भारत पानझाडे, विष्णू चेके, विष्णू मोतीवार, चेतन पिटलोर, संतोष पिंपळे, अजाबराव गोल्डे, शंकर अंभोरे, किशोर गिरी असे एकूण ३० जणांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईसाठी चिखली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. दरम्यान, प्रत्येकाकडून ग्रामपंचायतद्वारे १०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात येऊन योग्य समज देत सोडून देण्यात आले असले, तरी यापुढे शौचालयांचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर न करता उघड्यावर जाणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ (११७) नुसार कायदेशीर कारवाई करून १२०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. सोबतच सदरची व्यक्ती शिक्षेस पात्र ठरणार असल्याने तालुक्यातील जनतेने तातडीने शौचालये बांधावीत व त्यांचा नियमित वापर करून स्वच्छ भारत मिशनला बळकटी द्यावी, असे आवाहन पंचायत समितीच्यावतीने करण्यात आले आहे. महिला गुड मॉर्निंग पथकही होणार सक्रिय!शौचालयांअभावी विशेषत: महिलांची कुचंबणा होत असते. ही बाब हेरून अनेक कुटुंबातील महिलांनी हलाखीची परिस्थिती असतानाही चक्क मंगळसूत्र विकून पुढाकार घेत शौचालयांची उभारणी केली आहे. अशी अनेक उदाहरणे असून त्यांचा आदर्श जोपासणे गरजेचे आहे. मात्र, अनेक महिलांनाही अद्याप शौचालयाचे महत्त्व पटलेले नाही. त्यामुळे आता उघड्यावर जाणाऱ्या महिलांवरही कारवाई होणार असून, त्यासाठी पंचायत समितीद्वारे महिला गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्यात येणार आहे.