या असतील अटी..
जिल्ह्यात अद्यापही कोरोना निर्बंध कायम आहेत. त्यानुसार २५ जणांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी आहे. त्याशिवाय उपस्थित सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
शुभमुहूर्त
गेल्या तीन महिन्यांपासून लग्नाचे मुहूर्त असले तरी प्रत्यक्षात निर्बंधांमुळे या मुहूर्तांना लग्नांचे प्रमाण कमी झाले आहे. या महिन्यात १ व २ जुलै रोजीही मुहूर्त होते, तर यासह १२, १३ आणि १५ तारखेला विवाहासाठी योग्य मुहूर्त आहेत. त्यानंतरच्या पंधरवड्यात मुहूर्त असून, त्यातही अनेक ठिकाणी विवाह होणार आहेत.
परवानगीसाठी अग्निदिव्य
सध्या कोरोना निर्बंधांमुळे २५ जणांच्याच उपस्थितीत विवाह होत आहेत. यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. विवाहाची तारीख व स्थळाबरोबरच उपस्थितीबाबत हमी लिहून दिल्यानंतर परवानगी दिली जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर पोलीस विभागातर्फे विवाह समारंभांवर वॉच असणार आहे.
वधू-वर पित्याची कसरत
लग्न अचानक ठरल्याने उत्साह होता. मात्र, नियमांचे पालनही बंधनकारक आहे. त्यामुळे मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ झाला आहे.
- भानुदास वानखडे
कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यंत साधेपणाने लग्न करावे लागले. मोठे लग्न करण्याचे नियोजन होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशाचे पालन करून हा समारंभ कौटुंबिक स्तरावर घेतला.
- बाबूराव जाधव.