शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

गोरेगाव सरपंचाविरुद्धचा अविश्‍वास ठराव बारगळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:56 PM

सिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देग्रामपंचायतमध्ये झाले प्रत्यक्ष मतदानसीमा पंचाळ कायम 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला. असा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी दिला. गोरेगाव येथे कायमस्वरूपी नळयोजना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर होताच काही नागरिकांनी योजनेविरुद्ध रनकंदन उठविले होते. या योजनेचे श्रेय कोणत्याही परिस्थितीत सरपंच सीमा संजय पंचाळ यांना मिळू नये, म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करून १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार संतोष कणसे यांच्या कार्यालयात उपसरपंच रहीमखा शेरखा पठाण, गीताबाई संतोष गवई, गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत गोरेगाव येथे प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ हे चारच सदस्य हजर होते. या चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. ग्रामपंचायत मुंबई अधिनियम १९५८ कलम उपमध्ये नमूद केल्यानुसार सर्वसाधारण सरपंच पदाकरिता अविश्‍वास दाखल करण्याकरिता २/३ पेक्षा कमी नसेल तरच बहुमताने ठराव पारित होऊ शकतो, सरपंचावरील अविश्‍वास ठराव पारित करण्यासाठी सातपैकी पाच सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक होते. परंतु चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाला पाठिंबा दर्शविल्याने बहुमताने असा ठराव संमत होत नाही. त्यामुळे सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्या विरुद्ध करण्यात आलेला अविश्‍वास ठराव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी गोरेगाव ग्रामपंचायतमध्ये दिला. अविश्‍वास ठराव बारगळल्यामुळे गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ कायम आहेत. अविश्‍वास ठराव मतदानाच्या वेळी पटवारी मांडगे, ग्रामसेवक मनोज मोरे यांनी सहकार्य केले. तर ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकॉ गणेश डोईफोडे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत