शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सैलानी यात्रेत गोवंश हत्येला बंदी

By admin | Published: March 09, 2015 1:56 AM

मागील वर्षी यात्रेत २१00 पशूंचा गेला बळी; कायद्याची अंमलबजावणी सुरू.

बुलडाणा : बोकड, कोंबडे, बैल आणि रेडे अशा हजारो पशूंचे बळी घेणार्‍या सैलानी यात्रेत यावर्षी पासून गोवंश हत्येला प्रतिबंध घालण्यात आल्याने येथे होणारी बैलाची कत्तल थांबली आहे. १ मार्च पासून सैलानी यात्रेला प्रारंभ झाला. १ ते ६ मार्चदरम्यान सैलानी यात्रेत ६0 बैलांची कत्तल करण्यात आल्याची अधिकृत माहिती आहे. ६ मार्चपासून मात्र बैल कापण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.सैलानी यात्रा ही हिंदू- मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जात असले तरी, येथे अंधश्रद्धेचा अक्षरश: बाजार मांडल्या जातो. येथे येणारा भाविक कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने त्रस्त असतो. या मनोरुग्णावर कोणत्याही शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार केल्या जात नसून, मांत्रिकाच्या हस्ते गंडा-दोरी, अंगारे धुपारे करून आघोरी उपचार केल्या जातात. अंगावर चाबकाचे फटके मारणे, तापलेल्या सळईने डाग देणे, हातापायात बेड्या ठोकणे, महिलांचे केस धरून त्यांना फरपटत नेणे असे अमानवीय प्रकार येथे उघडपणे घडत असतात. आजच्या विज्ञान युगातही असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे मानसिक आजार बरे व्हावेत म्हणून येथे येणारे मनोरुग्णाचे नातेवाईक सैलानी बाबाला नवस करतात. आजार बरा कर, तुला दोन पायाचं, चार पायाचं वाहीन (कोंबडं, बकरा) अशी मन्नत मागतात आणि ठरल्याप्रमाणे सैलानी यात्रेत कोंबडे व बकर्‍याचा बळी देऊन नवस पूर्ण केल्या जातो.सैलानी यात्रेत पशूंचा बळी देण्याची ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे येथील यात्रेत दरवर्षी हजारो पशूंची हत्या केली जाते. देशाच्या कानाकोपर्‍यातून येथे आलेले भाविक पाच-पाच दिवस मुक्कामी असतात. त्यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणावर बैल व रेड्यांची कत्तल केल्या जात होती. मात्र गोवंश हत्या बंदी कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने या कायद्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. लवकरच हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सैलानी यात्रेत सुरू असलेली गाय, बैल, गोर्‍हे या जनावरांच्या कत्तलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, सध्या सैलानी यात्रेत बोकड, कोंबडे, म्हैस आणि रेड्यांच्या हत्येवर बंदी नाही. बैल, गायी, वासरे यांची हत्या करण्यास शासनाने ६ मार्चपासून बंदी आणली आहे. त्यामुळे सैलानी यात्रेत वरील जनावरांना कत्तलीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ म्हैस व रेड्याला परवानगी दिली असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी आर.बी. पाचरणे यांनी स्पष्ट केले.