शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

सरकारी दूध संकलनात घट!

By admin | Published: June 03, 2017 12:28 AM

खासगी संस्था, लघू व्यवसायाकडे वळले जिल्ह्यातील दूध उत्पादक

नीलेश शहाकार । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाकडून दूध व्यावसायिकांना मिळणारा कमी भाव, तसेच चारा व पाणीटंचाईसदृश परिस्थितीचा परिणाम जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायावर होत आहे, त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील दूध संकलनात मोठी घट आढळून आली आहे. जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये विविध सरकारी संस्थांकडे केवळ सरासरी ३ हजार ५२२ प्रति.दिन लिटर दूध संकलन करण्यात आले आहे, तर २०१५-१६ मध्ये हा आकडा सरासरी ७ हजार ०७४ प्रति.दिन लिटर होता.शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते; मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीत व दरवर्षी उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईमुळे जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन कमी होते. त्यातच शासनाकडून शेतकऱ्यांना गाय व म्हैशीच्या दुधासाठी शासकीय दरानुसार केवळ २४ रुपये ते ३७ रुपये लिटरपर्यंत भाव दिला जातो; मात्र तेच खासगीमध्ये दुधाला ३५ रुपये ते ४५ रुपये लिटर भाव आहे. यामुळे सरकारी दूध संकलन केंद्रांकडे पाठ फिरवून शेतकरी पाकीटबंद दूध, चिज निर्मिती करणाऱ्या खासगी संस्था आणि पनीर, खवा, लस्सी, ताक बनविणाऱ्या लघू व्यावसायिकांना दूध विक्री करतात. शिवाय चिल्लर दूध विके्रता ५० रुपये ते ६० रुपये भावाने दूध विकून जास्त नफा मिळत आहे.जिल्ह्यात ३० ते ३५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ५०८ दूध संस्था शासकीय व राजकीय अनास्थेमुळे अवसायनात आल्या आहेत. या शिवाय सद्यस्थितीत ७२ सरकारी व सहकारी दूध संस्थांची नोंद जिल्हा निबंधक दुग्ध विकास कार्यालयात आहे. त्यापैकी ४३ बंद आहेत, तर २९ संस्थांमध्ये नियमित दूध पुरवठा सुरु आहे.मात्र नैसर्गिक व आर्थिक परिस्थितीने खचलेल्या दूध व्यावसायिक शेतकऱ्यांनी या संस्थांकडे पाठ फिरविली आहे. परिणामी सरकारी दूध संकलनात मोठी घट दिसून येत आहे. बुलडाण्यातील दूध जाते जालना व अकोला जिल्ह्यातजिल्ह्यात सुरु असलेल्या २९ सहकारी दूध संस्थांमध्ये यावर्षी सरासरी ३५२२ प्रति.दिन लिटर दूध गोळा झाले. यात तालुका दूध संघाकडून देऊळगावराजा येथील दूध संकलन केंद्रात गोळा होणारे दूध जालना जिल्ह्यात आणि जिल्हा संघाकडून चिखली संकलन केंद्रात गोळा करण्यात आले. दूध अकोला जिल्ह्यात पाठविले जाते. नांदूर, मलकापूर, शेगाव या रेल्वे मार्गावर असलेल्या तालुक्यातील दूध मोठ्या प्रमाणात दूध पावडर आणि पॅकेटसाठी जळगाव व नागपूरकडे पाठविले जात आहे.