किशोर मापारीलोणार, दि. १३- जिल्हय़ात चार ठिकाणी नाफेडच्यावतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या तूर बाजारात विक्रीसाठी येत असली, तरी अद्याप शासनाच्यावतीने तूर खरेदीला प्रारंभ करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकर्यांची व्यापार्यांकडून लूट होत आहे. वर्हाडात तूर विक्रीस सुरुवात झाली असून, मोठय़ा प्रमाणात शेतकरी बाजारात तूर विक्रीला आणत आहेत. लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभाव योजनेंतर्गत तूर खरेदीचा शुभारंभ ३0 डिसेंबर रोजी संचालक, आडते, व्यापारी, हमाल व शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला; मात्र १३ दिवसांनंतरही तूर खरेदी करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. शासकीय हमीभाव योजनेंतर्गत दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.द्वारा तूर या शेतमालाची शासकीय भावाप्रमाणे खरेदी सुरू झाली असून, शासनाने ठरवून दिलेल्या एफ.ए.क्यू. दर्जाच्या निकषानुसार मारुती व निर्मल जातीच्या तुरीची खरेदी करण्यात येईल, असे नाफेडच्यावतीने ठरविण्यात आले आहे; परंतु १३ दिवसांनंतरही तूर खरेदी करण्यात आलेली नाही. बाजार समितीमध्ये तूर घेऊन आल्यानंतर तूर खरेदी केंद्र कुठेही दिसत नसल्याने शेतकर्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्यांना कमी भावात तूर विकावी लागत आहे. शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत असून, जाणीवपूर्वक पिळवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.व्यापार्यांचा दुहेरी फायदाशेतकर्यांकडून व्यापारी कमी भावात तूर खरेदी करतात व हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर विक्री करतात. त्यामुळे व्यापार्यांचाच दुहेरी फायदा होतो. शेतकरी हितासाठी सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्राचा लाभ व्यापारीच घेतील आणि शेतकरी बांधवांची उपासमार होईल. शेतकरी हितासाठी शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी केली आहे.
तूर खरेदीकडे शासनाची पाठ!
By admin | Published: January 14, 2017 12:31 AM