शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर दाखवतात खासगी मेडिकलचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 5:41 PM

बुलडाणा:  जिल्ह्यात काही ठिकाणी गुरांना पायखुरी व तोंडखुरी आजाराची लागन झालेली आहे. या रोगावर प्रतिबंध मिळविण्यासाठी लागणाºया औषधीकरीता पशुवैद्यकीय विभागाकडून पशुपालकांना खासगी मेडिकलवर पाठविल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

-  ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा:  जिल्ह्यात काही ठिकाणी गुरांना पायखुरी व तोंडखुरी आजाराची लागन झालेली आहे. या रोगावर प्रतिबंध मिळविण्यासाठी लागणाºया औषधीकरीता पशुवैद्यकीय विभागाकडून पशुपालकांना खासगी मेडिकलवर पाठविल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. औषधीचे हे बील एक ते दीड हजार रुपयांपर्यंत येत असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे पशुसंवर्धन व्यवसायाकडे वळले आहेत. शेतीला पूरक असलेल्या पशुसंवर्धन व्यवसायामुळे अनेकांचा आर्थिक विकास साधला गेल्याचे उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात पाहावयास मिळते. परंतू या व्यवसायामध्ये पशुधनाची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे. एखादा आजार एका जनारावराला झाल्यास इतर जनावरांनाही त्याची लागन होण्यास वेळ लागत नाही. सध्या बदलत्या हवामानामुळे गुरांना पाय व तोंड खुरी या रोगाची लागण झालेली आहे. वेळेवर लसीकरण केल्यास अशा रोगांपासून पशुधनाला वाचविले जाऊ शकते, मात्र सध्या दुष्काळी परिस्थिती असताना जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळत आहेत. परिणामस्वरूप दुष्काळात पशुपालकांची चिंता वाढली आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांकडून या जनावरांची तपासणी केल्यानंतर गुरांना लागणाºया औषधीसाठी पशुपालकांना खासगी मेडिकलवर पाठविल्या जात असल्याचा प्रकार मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथे दिसून आला. त्याचबरोबर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गुरांच्या तपासणीनंतर त्यांना लागणारी औषधी सरकारी डॉक्टरांकडून एका चिठ्ठीवर लिहून दिल्या जाते. ही औषधी बाहेरून आणण्यासाठी पशुपालकांना एक ते दीड हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे गुरांच्या औषधीचा खर्च या पशुपालकांना झेपत नाही. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत. 

 खासगी मेडिकलवरही अर्धवट औषधीपशुवैद्यकीय दवाखान्याच्या डॉक्टरांनी गुरांची तपासणी करून लिहून दिलेली औषधी ही खासगी मेडिकलवरही पूर्ण मिळत नसल्याची माहिती ऊमरा देशमुख येथील पशुपालक राजेश डोळस, रमेश देशमुख, बंडू खंडारे यांच्यासह काही पशुपालकांनी दिली आहे. त्यामुळे अर्धवटच औषध खासगी मेडिकलवर या पशुपालकांना मिळाली आहे. 

 गतवर्षी ९३ टक्के गुरांवर औषधोपचारजिल्ह्यात एकूण पशुधन संख्या १० लाख २० हजार ३७ आहे. त्यात गायवर्ग व म्हैसवर्ग ५ लाख ६७ हजार ७३३, लहान पशुधन (वासरे) गायवर्ग व म्हैसवर्ग ६१ हजार २५७ आहेत. तर शेळी वर्ग १ लाख ७ हजार ३० व मेंढी वर्ग १० लाख २० हजार ३७ आहे. या संपुर्ण गुरांच्या अरोग्याच्यादृष्टीने  लसीकरण व औषधोपचार जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येते. गतवर्षी औषधोपचारासाठी पाच लाख १८९ गुरांच्या औषधोचाराचा लक्षांक जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे ठेवला होता. त्यापैकी ९३ टक्के म्हणजे चार लाख ६९ हजार ५७१ गुरांवर औषधोपचार करण्यात आले.

 अखेर पथक दाखलगुरे तोंड व पायखुरी रोगाचे शिकार ठरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १६ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथे पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने तातडीने भेट देऊन गावातील गुरांची तपासणी केली. याठिकाणी अनेकांच्या पशुधनाला तोंड व पायखुरी रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. या डॉक्टरांकडून पशुपालकांना औषधी लिहून देण्यात आली. 

 

गुरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याला औषध पुरवठा केला जातो. परंतू गुरांच्या जखमा जर तीव्र स्वरूपाच्या असतील तर एखाद-दुसरी औषधी ही बाहेरून बोलावली जाते. यामागे गुरांवर चांगाला उपचार व्हावा व त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, हाच उद्देश असतो. - डॉ. किशोर ठाकरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdoctorडॉक्टर