सरकारला घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:07 AM2018-01-26T02:07:49+5:302018-01-26T02:08:16+5:30
देऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीच्यावतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान देऊळगांवराजा येथे आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या हिताचे कार्यक्रम राबवण्यात हे सरकार कमी पडले आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्यांची फसवणूक केली. आमच्या सरकारच्या काळात शेतकर्यांना असा त्रास कधी झाला नाही. राष्ट्रवादीने भाजपा शिवसेना सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले असून हल्लाबोल यात्रा हा त्याचाच भाग आहे. महाराष्ट्राला दिशाहीन करण्याचे एकमेव काम हे सरकार करत आहे. राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा लढा अजून आक्रमक करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
जालना येथून देऊळगांवराजा तालुक्यात आगमन होत असतांना विदर्भ मराठवाडयाच्या सिमेवर असलेल्या भिवगांव येथे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांचे स्वागत केले. तेथून सातशे मोटर सायकलीसंह रॅली निघून बसस्थानक चौकात आगमन झाले.