मुकूंद पाठक
बुलडाणा / सिंदखेडराजा : राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी माँसाहेब जिजाऊ यांना वंदन करून आपल्या दोनदिवसीय विदर्भ दौऱ्याला शुक्रवारी सुरुवात केली. यावेळी, येथील ऐतिहासिक स्थळांची पाहणीही त्यांनी केली.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथून राज्यपाल यांचा ताफा सिंदखेडराजा येथे दाखल झाला. शासकीय विश्राम गृह येथे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड. नाझेर काजी, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. पद्धतीनुसार राज्यपाल यांना पोलीस दलाने मानवंदना दिली. त्यानंतर राज्यपाल यांनी काहीवेळ पालकमंत्री व अन्य उपस्थितांशी चर्चा केली. त्यानंतर शहरातील ऐतिहासिक मोती तलाव येथे जावून पाहणी केली. त्यांनी थेट राजे लखोजीराव जाधव यांचा राजवाडा येथे भेट देवून माँसाहेब जिजाऊ यांना वंदन करून उपतस्थितांकडून राजवाड्याची माहिती जाणून घेतली. आपण या ठिकाणी भेट देवून धन्य झाल्याचे राज्यपाल म्हणाले.