यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सर्वश्री प्रा. जगदेवराव बाहेकर, डॉ. वसंतराव चिंचोले, प्राचार्य वायाळ, श्री. व्ही. टी. देशमुख आदी उपस्थित हाेते. प्रास्तविक कला शाखा प्रमुख प्रा. डॉ. श्रीराम येरणकर यांनी केले. प्रमुख अतिथी प्रा. जगदेवराव बाहेकर यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेऊन कुटुंब, समाज व राष्ट्राची सेवा करण्याचे आवाहन केले. डॉ. वसंतराव चिंचोले यांनी शिक्षणाचे प्रतिबिंब आपल्या जीवनात उमटले पाहिजे असे प्रतिपादन केले. प्राचार्य वायाळ यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा केली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या नावाची उद्घोषणा कला शाखा प्रमुख डॉ. श्रीराम येरणकर, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. डॉ. एस. आर. इंगळे व वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. एकनाथ हेलगे यांनी केली. समारंभास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. संचालन प्रा. सुबोध चिंचोले यांनी तर आभार रेश्मा सोनवलकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या विकासासाठी कटिबद्ध
महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास आणि महाविद्यालयास सर्वांच्या सहकार्याने उच्च दर्जा प्राप्त करून देण्याचा आपला प्रयत्न राहील असे मत नवनियुक्त प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले़